गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलं असून कालच संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे.
गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. या प्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर ईडीने संजय राऊत यांच्या विरोधात ४ हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. पत्राचाळ प्रकल्पातून संजय राऊतांनी पैसे कमावले, असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत यांना या प्रकरणातले प्रमुख आरोपी म्हणण्यात आलं आहे. वाधवान बंधूंसोबत संगनमत करून संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचंही या आरोपपत्रात म्हटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”
बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप
अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन
‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’
संजय राऊत यांना ३१ जुलैला ईडीने नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. त्यानंतर ईडी कार्यालयातील चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आणि चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. पुढे त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली. त्यानंतर संजय राऊत यांची काल न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यामुळे त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून, ४ ऑक्टोबर पर्यंत संजय राऊत यांचा मुक्काम कोठडीतच असणार आहे.