पत्रकार आणि लेखिका राणा अय्यूब यांच्यावर ईडीने गुरुवारी, १० फेब्रुवारी रोजी मोठी कारवाई केली आहे. राणा अय्यूब यांची तब्बल १.७७ कोटी इतकी रक्कम गोठवण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी राणा अय्यूब यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
विकास सांकृत्यायन या व्यक्तीने राणा अय्यूब यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. राणा अय्यूब यांनी मदतनिधी उभारण्यासाठी वेगवेगळ्या नावाने अभियान चालवले आणि त्यातून अवैधरित्या देणग्या गोळा केल्या. त्यानंतर ही रक्कम स्वत:साठी वापरली. याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली होती. त्याआधारे त्यांच्यावर गेल्या सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने तपास केला असता अनेक बाबी पुढे आल्या होत्या. त्याआधारे राणा अय्यूब यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
खबरदार ! रेल्वेच्या दिव्यांग डब्यातून प्रवास कराल तर…
लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको, मंगेशकर कुटुंबियांचे आवाहन
भारत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देणार?
एका तासात त्यांनी चोरले होते एक डझन मोबाईल…
मदतनिधीसाठी देणगी स्वरूपात १.७७ कोटी इतकी रक्कम जमा झाली होती, असेही तपासात स्पष्ट झाले होते. ही रक्कम असलेले खाते अखेर गुरुवारी गोठवण्यात आले आहे. कोणतीही मंजुरी न घेता विदेशातून देणगी मिळवल्याने राणा अय्यूब या अडचणीत आल्या आहेत.
याप्रकरणी ईडी आणि आयकर विभाग यांच्याकडून चौकशी सुरू असून राणा अय्यूब यांच्या आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्याआधारेच आता ईडीने रक्कम गोठवण्याचे पाऊल उचलले आहे.