संजय पांडेंविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

संजय पांडेंविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यावर यापूर्वी आरोप झाले होते आता त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.

आधी फक्त सीबीआयने संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता त्या आधारे ईडीकडूनसुद्धा संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, फक्त फोन टॅपिंगच्या कामासाठी ४ कोटी ४५ लाख रुपये पांडे यांच्या कंपनीला मिळाले होते.तसेच संजय पांडे यांच्या आयसेक सर्विस कंपनीला एनएससी कडून आणि काही कंपन्यांकडून तब्बल २० कोटी मिळाले होते, असेही आता उघड झाले आहे. याचा अधिक तपास सुरु आहे. ईडीने नुकतीच एनएससीला नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणात आर्थिक व्यवहारची तसेच काही कागदपत्रे मागीतली होती. यावरून आता ईडीने संजय पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

या प्रकरणी सीबीआयने आरोप केला होता की, नारायण आणि रामकृष्ण यांनी मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कंपनीला शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे अटकाव करण्यासाठी गुंतवले होते. दरम्यान, ईडीकडूनही लवकरच पांडे यांना पुन्हा चौकशीला बोलावण्याची शक्यता असून त्यांच्या अटकेची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version