ईडीचे माजी उपसंचालक सचिन सावंत यांना ईडीकडून अटक

५०० कोटींच्या हेराफेरीचा सावंत यांच्यावर आरोप

ईडीचे माजी उपसंचालक सचिन सावंत यांना ईडीकडून अटक

‘आयआरएस’ अधिकारी आणि ईडीचे मुंबई विभागाचे माजी उपसंचालक सचिन सावंत यांना लखनौ येथून ईडीने अटक केली आहे. दरम्यान ईडीने त्यांच्या मुंबईतील घरासह इतर ठिकाणी छापेमारी करून काही महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतला आहे. सावंत हे ईडीचे उपसंचालक असतांना जीएसटीच्या एका प्रकरणात ५०० कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सावंत यांच्या अटकेला ईडीकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सचिन सावंत हे सद्या लखनौ सीमाशुल्क विभाग आणि जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त म्हणून तैनात होते, सावंत यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी बुधवारी अटक केली आहे. त्यांना लखनौहून मुंबईला आणण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत ईडीच्या उपसंचालक पदावर असताना आयआरएस अधिकारी सचिनवर ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

लखनौमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून २००८च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असलेले सचिन सावंत यांची मुंबईत उपसंचालक ईडी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या हिरे कंपनीच्या प्रकरणाच्या तपासात बेकायदेशीर कारवाया उघडकीस आलेल्या होत्या. दरम्यान सावंत यांच्या विरोधात एका आरोपीने तक्रार दाखल केली होती, त्या नंतर त्या आरोपीला अटक करण्यात आली होती. परिणामी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हे ही वाचा:

भारतीय लष्कराची क्षमता पाहून चीनला भरली धडकी, नियुक्त केले तिबेटी सैनिक

“संजय राऊत लोकांचे पैसे खाऊन बावनकुळेंवर टीका करतात”

डॉक्टरांचा सल्ला झुगारून दुखापतग्रस्त ममता बॅनर्जी घरी परतल्या

वॅगनरनंतर जगभरातील खासगी लष्करी दलांकडे वळले लक्ष

सावंत यांच्या मुंबईतील शालिमार वन अपार्टमेंटमध्ये छापा टाकून पथकाने अनेक कागदपत्रे, बँक खात्याचे तपशील आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली.ईडीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेला छापा हा आयआरएस अधिकाऱ्यावरील आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून पाहिला जात आहे. ईडी या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग पैलूचा शोध घेत आहे आणि मनी ट्रेल शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. गुन्ह्यातून मिळालेली रक्कम कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली गेली का, याचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Exit mobile version