सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

ईडीचे अधिकारी सदानंद कदम यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्यांना घेऊन रवाना.

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार  सदानंद कदम यांना ताब्यात घेतलं आहे . ईडीचे अधिकारी सदानंद कदम यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्यांना घेऊन रवाना झाले आहेत. सदानंद कदम यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का देतांना ईडीने शुक्रवारी उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या जवळचे सदानंद कदम यांना ईडीच्या पथकाने सदानंद कदम यांना रत्नागिरी गावातील कुडोशी येथील अनिकेत फार्म हाऊसमधून अटक केली. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली होती.

महाराष्ट्रातील रत्नागिरीतील दापोली परिसरात असलेले साई रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये सदानंद कदम आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब हे दोघे कथित भागीदार आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सदानंद कदम हे एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत.

हे ही वाचा:

पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन

‘वंदे भारत’ला आता मिळणार टाटा स्टीलची मजबुती

मनीष सिसोदियांना हवी सहानुभूती; दारू घोटाळ्यापासून लक्ष हटविण्यासाठी पत्रप्रपंच

लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर १५ ठिकाणी छापे

शुक्रवारी ताब्यात घेतल्यानंतर सदानंद कदम यांना ईडीचे अधिकारी मुंबईत पुढील चौकशीसाठी मुंबईत घेऊन आले. शुक्रवारी दुपारी बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात सदानंद कदम याना नेण्यात आले. त्यांची तीन तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाईल. त्यानुसार आता शनिवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सदानंद करम यांना ताब्यात घेतले आहे. आता त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्यांना ईडीचे अधिकारी घेऊन रवाना झाले आहेत . सदानंद कदम यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कदम हे अनिल परब यांचे आघाडीचे माणूस असून त्यांनी परब यांच्या वतीने सर्व गैरप्रकार घडवून आणले. त्याच्या रत्नागिरीतील घराचीही झडती घेण्यात आली असून, काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात त्याची अधिक चौकशी करण्यासाठी आम्ही कोर्टाकडून त्याची कोठडी मागणार आहोत, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. कदम यांच्या रत्नागिरीतील घराचीही झडती घेण्यात आली असून, काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात त्याची अधिक चौकशी करण्यासाठी कोर्टाकडून त्याची कोठडी ईडी मागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Exit mobile version