पुण्यातील भोसरी येथील जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना आज दुसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने १५ जुलैपर्यंत त्याच्या ईडी कोठडीत वाढ केली आहे. या प्ररकणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची गेल्या आठवडयात ९ तास चौकशी केली होती.
एकनाथ खडसे भाजप मध्ये मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागेत खडसे यांचे जावई गिरीश चौधरी आणि पत्नी मंदाकिनी यांच्या नावावर जमिनीचा व्यवहार झाला होता. खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग करून स्वस्तात ही जाग घेतली असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असल्याचॆ संशयावरून ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
हे ही वाचा:
धरमशालामध्ये ढगफुटी, मालमत्तेचं मोठं नुकसान
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काँग्रेसवर पाळत ठेवतात?
राष्ट्रवादी, शिवसेनेला कापरं भरलं म्हणून त्यांनी पाळत ठेवली असावी
दरम्यान मागच्या आठवड्यात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावून रात्री उशिरा त्यांना अटक केली होती. दुसऱ्या दिवशी चौधरी यांना पीएमएएल न्यायालयाने गिरीश चौधरी यांना सोमवारपर्यत ईडी कोठडी सुनावली होती. सोमवारी त्याची कोठडी संपताच त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
ईडीने न्यायालयात चौधरी यांची ९ दिवसाची कोठडी वाढवून मागितली होती. मात्र न्यायालयाने केवळ ३ दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे. १५ जुलैपर्यंत चौधरी यांची कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची गेल्या आठवड्यात ९ तास चौकशी केली आहे. तसेच १० दिवसांच्या आत भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणातील कागदपत्रे ईडी कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. या प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांचे नाव देखील समोर आले असून त्यांनादेखील समन्स पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.