वाधवान बंधूंची ७०.३९कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा तरतुदींनुसार कारवाई

वाधवान बंधूंची ७०.३९कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

३४ हजार कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले ‘डीएचएफएल’ संचालक वाधवान बंधूंची ७०.३९कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिलेल्या माहितीनुसार डीएचएफएल चे संचालक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या मालकीचे ७०.३९ कोटीची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत २८.५८कोटींचे संलग्न मालमत्ता,५ कोटींची घड्याळे, १०.७१ कोटींचे हिरेजडित दागिने, ९ कोटींचे हेलिकॉप्टरमधील २० टक्के स्टेक आणि १७.१० कोटी रुपयांच्या वांद्रे येथील दोन फ्लॅट्स समावेश आहे.

 

यापूर्वी ईडीने वाधवान बंधूंची ५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. येस बँक डीएचएफएल फसवणूक प्रकरणात कपिल वाधवान आणि धीरज वाधवन यांना अटक केली आहे जे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने वाधवानांची ५ कोटी रुपयांची वाहनेही तसेच १२.५९ कोटींची मालमत्ता देखील यापूर्वी जप्त केली आहेत.

 

हे ही वाचा:

शरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं?

राहुल शेवाळे प्रकरणातील उद्धव ठाकरे, संजय राऊतांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितली, धर्मांतर, मैदानावर नमाज, पाकिस्तानमधील हिदूंची दुरवस्था

भारताकडून कॅनडाच्या व्हिसाबाबत शिथिलता

डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पीसी ऍक्ट,१९८८ च्या विविध कलमांखाली सीबीआय ने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला.

 

 

डीएचएफएल आणि इतर १७ बँकांच्या कन्सोर्टियमची ३४ हजार ६१५ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात कपिल वाधवान आणि धीरज वाधवान या डीएचएफएलचे दोन्ही संचालक आणि इतर आरोपींनी युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय) च्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या कन्सोर्टियमची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

Exit mobile version