सदानंद कदमनंतर आता या नेत्याच्या मागे ईडीचा ससेमिरा

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीची कारवाई

सदानंद कदमनंतर आता या नेत्याच्या मागे ईडीचा ससेमिरा

उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तिय सदानंद कदम यांच्यावर ईडीने सकाळी छापेमारी केली. या कारवाईला काही काळ लोटत नाही तोच आता आणखी एका नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने आता राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्यावर छापेमारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने पुणे आणि कोल्हापूरमध्ये ही छापेमारी केली असल्याचे सांगितले जात आहे.

माजी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरांवर ईडीने शुक्रवारी छापेमारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडीची कारवाई झाली आहे. या कारखान्याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर १००कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

ईडीने शुक्रवारी याच प्रकरणात मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुणे आणि कोल्हापूर येथे छापेमारी केली आहे. ईडीने आणि प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी ११ जानेवारी रोजी छापे टाकले होते. त्यावेळी मुश्रीफ यांचे नातेवाईक आणि मुलीच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता . हसन मुश्रीफ यांच्या घरावर असाच छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी येऊन स्पष्टीकरण देताना आपला या घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. आता ईडीकडून पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ यांचे घर आणि कार्यालय येथेही ईडीने सर्च ऑपरेशन केल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन

सदानंद कदमची ईडीकडून चौकशी…सोमय्या म्हणाले, अब तेरा क्या होगा अनिल परब

अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी – विरोधक भिडणार

झी जिनपिंग यांचा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदाचा विक्रम

काय आहे प्रकरण

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या यांनी १२७ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळ्यात हसन मुश्रीफ यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे, त्यांनी त्यांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्यात १०० कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा आरोपही केला आहे. हसन मुश्रीफ यांनी या कारखान्यातील ९८ टक्के रक्कम मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून जमा केल्याचा आरोप आहे.

Exit mobile version