दिनो मोरिया, संजय खानच्या मालमत्तेवर ईडीची जप्ती

दिनो मोरिया, संजय खानच्या मालमत्तेवर ईडीची जप्ती

बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया, डीजे अकील अब्दुलखालिल बच्चू अली, संजय खान, इरफान अहमद सिद्दीकी यांच्याशी संबंधित करोडो रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालय अर्थात जप्ती आणली आहे गुजरात मधील व्यापारी संदेसरा बंधू यांच्याशी संबंधित कर्ज घोटाळा प्रकरणात ही कारवाई केली गेली आहे. संदेसरा बंधू यांच्यावर १६००० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचा ठपका आहे.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्टच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून संदेसरा बंधूंशी संबंधित घोटाळ्यात १४,५०० रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे. यात दिनो मोरियाशी संबंधीत १ कोटी ४० लाख रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली गेली आहे. तर संजय खानच्या ३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बिकट

पुलवाममध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जीएसटीमुळे अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन पर्यंत पोहोचेल

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचा राजीनामा

पेशाने डीजे असणाऱ्या अकील अब्दुलखालिल बच्चू अली याच्याशी संबंधित १ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे तर इरफान अहमद सिद्दीकी याच्या २ कोटी ४१ लाखांच्या मालमत्तेवर जप्ती आणली गेली आहे.

संदेसरा बंधू घोटाळा प्रकरणी तपास करताना ईडी समोर उघड झालेल्या बाबीनुसार संदेसरा यांनी गैर मार्गाने कमावलेला पैसा हा या चार जणांकडे फिरवण्यात आला. यामध्ये दिनो मोरिया, अकील अब्दुलखालिल बच्चू अली, संजय खान, इरफान अहमद सिद्दीकी यांच्याकडे अनुक्रमे १ कोटी ४० लाख, १२ कोटी ५४ लाख, ३ कोटी आणि ३ कोटी ५१ लाख इतके रुपये फिरवण्यात आले.

Exit mobile version