पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

शारदा घोटाळ्यासंदर्भात केली कारवाई

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. शारदा घोटाळा प्रकरणात ही कारवाई ईडीने केली आहे.

शारदा ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून नलिनी चिदंबरम यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. सुदिप्ता सेन या कंपनीजच्या प्रमुख होत्या त्यांनी ही नियुक्ती केली होती. कंपनीच्या आर्थिक कारभारात सल्ला देण्याचे काम नलिनी चिदंबरम यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

आता पूर्वोत्तर भारतातील मीडिया प्रकल्पांमध्ये सुदिप्त सेन यांनी केलेल्या गुंतवणूकीच्या संदर्भात ईडीकडून नलिनी चिदंबरम यांची चौकशी सुरू आहे. ईडीने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात असे नमूद केले आहे की, चिदंबरम यांची जप्त केलेली जंगम आणि स्थावर मालमत्ता अनुक्रमे ३.३० कोटी आणि ३ कोटी इतकी आहे. पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ईडीने म्हटले आहे की, ही मालमत्ता शारदा ग्रुप आणि इतर काहींची आहे. शारदा ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून जो घोटाळा झाला त्यातील हे लाभार्थी आहेत. या लाभार्थींमध्ये नलिनी चिदंबरम, देवव्रत सरकार, देबेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी मंत्री अंजान दत्ता यांच्या अनुभूती प्रिंटर्स आणि पब्लिकेशन यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

ड्रग्स विक्रेत्याचे डोके फिरले केली मित्राचीच हत्या

बीएमसीचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात… मुंबईकरांसाठी काय असेल ?

..हे म्हणजे आपल्या गल्लीत वाघ ठरण्यासारखे!

बायडेन, सुनक राहिले मागे, नरेंद्र मोदीच पुन्हा अव्वल

 

आतापर्यंत ईडीने शारदा चीट फंड प्रकरणात ६०० कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे.

२०१३मध्ये हा शारदा घोटाळा बाहेर आला. शारदा ग्रुपने याअंतर्गत एक योजना आणली होती. जवळपास १५ लाख गुंतवणूकदारांकडून त्यांनी पैसा गोळा केला. सुदिप्त सेन यांनी सीबीआयला २०१३ला दिलेल्या कबुलीनाम्यात म्हटले की, केवळ तृणमूलच्या नेत्यांनाच नाही तर आसाममधील काँग्रेस नेत्यांनाही पैसे देण्यात आले. आपल्याकडून कोणकोणत्या नेत्यांनी पैसे घेतले याची यादीच सेन यांनी तुरुंगातून दिली होती.

Exit mobile version