पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची पुण्यातील मालमत्ता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने जप्त केली आहे. ही मालमत्ता अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची आहे.
पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक अविनाश भोसले आणि मुलगा अमित भोसले यांच्याविरुद्ध पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा आधारे अंमलबजावणी संचालनालयने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ईडीने अविनाश भोसले आणि पुत्र अमित भोसले यांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. शेवटी त्यांची ४ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
सरकारी जागेवर बांधकाम केल्याप्रकरणी पुणे पोलिसानी दाखल केलेल्या गुन्हयात सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीनंतर सोमवारी ईडीने अविनाश भोसले यांची चार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
हे ही वाचा:
चक्क वकिलालाच पोलिस ठाण्यात ठेवले डांबून
शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र
म्हणून रखडली आहेत मुंबई, ठाण्यातील बांधकामे
ईडीने यापूर्वी अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांच्यावर केलेली ही मोठी कारवाई मानली जाते. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.