‘आणखी सहा दिवसांसाठी नवाब मलिकांच्या कोठडीत वाढ करा’

‘आणखी सहा दिवसांसाठी नवाब मलिकांच्या कोठडीत वाढ करा’

जमीन व्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा रिमांड आणखी सहा दिवसांसाठी वाढवून द्यावा अशी मागणी ईडीचे वकील अनिल सिंग यांनी केली आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.

सुनावणीदरम्यान अनिल सिंग यांनी न्यायालयासमोर सांगितले की, आरोपीने काही वैद्यकीय समस्येची तक्रार केली होती . त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात अर्थात जेजे रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला ऍडमिट होण्यास सांगितले होते. 28 फेब्रुवारीला आरोपीची उपचारानंतर सुटका झाली. नवाब मलिक यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे भर्ती करण्यात आले होते. पण त्यामुळे आम्हाला त्यांचा जबाब नोंदवता आलेला नाही.

अनिल सिंग यांनी पुन्हा एकदा आरोपी नवाब मलिक यांची चौकशी करता यावी यासाठी रिमांडचा जादा अवधी मिळावा अशी मागणी केली. ते म्हणाले की, अजून ६ दिवसांचा कालावधी हवा. या प्रकरणात आम्ही काहींचे जबाब घेतले आहेत. त्यातले ते जबाब आहेत रिमांड मध्ये हायलाईट केले आहेत. न्यायाधीशांनी रिमांडची प्रत वाचली.

ह्या प्रकरणात आरोपी सरदार शहावली खान याने दिलेल्या जबाबातील काही तपशीलाविषयी चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांनी काही माहिती दिली. म्हणून त्याअनुषंगाने आम्हाला त्यांची अधिक चौकशी करायची आहे.

हे ही वाचा:

‘महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला शरण आलेलं सरकार आहे’

मालामाल यशवंत जाधव ; १३० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा दावा

राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ; राज्यपाल सभागृह सोडून निघाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

 

नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमशी लिंक असलेला आणि मुंबईतील बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असलेल्या तसेच सध्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीकडून जमीन खरेदी केली होती. कमी दरात ही जमीन खरेदी केल्याचा ठपका मलिक यांच्यावर आहेच पण दाऊदसारख्या देशद्रोहीशी संबंध असलेल्या व्यक्तीशी व्यवहार केल्याचाही आरोप आहे. त्यासंदर्भात त्यांना ईडीने अटक केली आहे.

Exit mobile version