राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांच्यात सध्या उंदीरमांजराचा खेळ सुरू आहे. ईडीने गेल्या आठवड्यात आणि सोमवारी देशमुख यांना समन्स पाठविल्यानंतरही त्यांनी ईडीला सामोरे जाणे टाळले आहे. पण ईडी आता तिसरे समन्स पाठवून त्यांना आवश्यक त्या गोष्टी सादर करण्यास सांगणार आहे. या पाच गोष्टी आता देशमुख यांनी ईडीकडे सोपवायच्या आहेत. या गोष्टी अशा-
- श्री साई शिक्षण संस्थेला मिळलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या डोनेशन्सची माहिती.
- अनिल देशमुख यांच्या मागच्या पाच वर्षांच्या इन्कम टॅक्सची माहिती.
- देशमुख यांच्या सर्व संपत्तीचे डिटेल्स.
- आरोपी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांची पूर्ण माहिती. ते कधीपासून देशमुख यांच्यासोबत होते, किती काळ आणि त्यांच्यासोबत काही व्यवहार झालेत का त्याचीही माहिती.
- श्री साई शिक्षण संस्थेमध्ये एकूण किती संचालक आहेत? कुणाचा काय रोल आहे? पैसे कधी किती आले आणि आतापर्यंत ते कुठे खर्च झाले त्याची माहिती.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशच्या धर्मांतराचे ‘कनेक्शन’ बीडपर्यंत
कंटाळा आला आता….बारावीचे मूल्यमापन करा लवकर!
ईडीला चकविण्याचा अनिल देशमुखांचा आणखी एक प्रयत्न
मॉडर्ना ठरणार भारतातील चौथी कोरोना लस
अनिल देशमुख यांना तिसऱ्यांदा समन्स जारी झाल्यानंतर त्यांना ही माहिती घेऊन ईडी अधिकाऱ्यासमोर जावं लागेल.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांनी काही कालावधीनंतर राजीनामाही दिला. सीबीआयने यासंदर्भात चौकशी हाती घेतल्यानंतर त्याच दिशेने आता ईडीचा तपास सुरू आहे.