Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका

Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका

शोओमी मोबाईल चिनी कंपनीला ईडीने मोठा दणका दिला आहे. या कंपनीची तब्बल ५ हजार कोटींहुन अधिक मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. कंपनीने केलेल्या कर चोरी प्रकरणात ईडीने विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) अंतर्गत ही कारवाई केली आहे.

कंपनीने फेब्रुवारीमध्ये बेकायदेशीरपणे पैसे बाहेर पाठवल्याप्रकरणी तपास सुरू केलेल्या ईडीने कंपनीच्या बँक खात्यातून ही रक्कम जप्त केली आहे. ईडीने सांगितले की, २०१४ मध्ये भारतात काम सुरू केलेल्या Xiaomi ने ‘रॉयल्टी’ म्हणून तीन परदेशात असलेल्या संस्थांना ज्यात एक Xiaomi समूहाची घटक कंपनीचा देखील समावेश आहे. त्यांना या कंपनीने ५ हजार ५५१.३ कोटी रुपये पाठवले होते. ही रक्कम त्यांच्या चिनी मूळ कंपनीच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. इतर दोन यूएस-बेस्ड असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील Xiaomi समूहाच्या फायद्यासाठी पाठवण्यात आली होती, असा ईडीने आरोप केला आहे.

रॉयल्टीच्या नावाने एवढी मोठी रक्कम कथितपणे त्यांच्या मूळ चिनी कंपनीला पाठवले होते. ज्या परदेशी कंपन्यांना पैसे पाठवले त्यांच्यकडून कोणतीही सेवा मिळालेली नाही,असे आढळून आले आहे. कंपनीने ही रक्कम रॉयल्टीच्या स्वरूपात परदेशात पाठवली जी FEMA च्या कलम ४ चे उल्लंघन करते. परदेशात पैसे पाठवताना कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहिती देखील दिली, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’

जय जय महाराष्ट्र माझा…

चेन्नईच्या संघाची धुरा पुन्हा धोनीकडे

अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड

ईडीने केलेली कारवाई ही आयकर (आयटी) विभागाने केलेल्या तपासानंतर केली आहे, ज्यांनी यापूर्वी या कंपन्यांवर छापे टाकले होते. या कारवाईच्या दरम्यान कर चोरीच्या आरोपांना दुजोरा देणारा डेटा जप्त केल्याचा दावा कर अधिकाऱ्यांनी केला होता.

Exit mobile version