पुण्यातील उद्योगपतीवर ईडीची कारवाई; ९ कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस

कंपनीत फसवणूक केल्याचा आरोप

पुण्यातील उद्योगपतीवर ईडीची कारवाई; ९ कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस

गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी चांगलीच आक्रमक झाली असून अनेक राजकीय नेत्यांसह उद्योपती ईडीच्या रडारवर आहेत. अशातच पुणे येथील एका उद्योपतीवर ईडीने कारवाई केली आहे. पुणे येथील आयस्क्रीम कंपनीचे माजी संचालक रवी अय्यास्वामी रामसुब्रमण्यम आणि त्यांची पत्नी मिनाक्षी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची ९.७७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटिस पाठवली आहे.

आईस्ड डेसर्ट अँड फूड पार्लर्स इंडिया प्राइवेट लिमिटेड (आयडीएफपीएल) या कंपनीत रामसुब्रमण्यम संचालक होते. या कंपनीत ३८.६८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून या प्रकरणी पीएमएलए कायद्यानुसार १६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात आयडीएफपीएलमध्ये ३८.६८ कोटींच्या हेराफेरीसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडी मनी लांड्रिंग कायद्यानुसार करत होती. ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर रामसुब्रमण्यम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नोटीसमध्ये १० दिवसांत संपत्ती जप्त करण्याचे म्हटले आहे. त्याला रामसुब्रमण्यम यांनी आक्षेप घेत ४५ दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना १५ दिवसांसाठी दिलासा दिला आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल

दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय

जरांगेच्या मागे कोण?

श्रीलंका सरकारकडून बीसीसीआय सचिव जय शहांची माफी

रामसुब्रमण्यम यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती जी.ए.सानप आणि न्यायमूर्ती मंजुशा अजय देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. रामसुब्रमण्यम यांचे वकील स्वप्निल अंबुरे यांनी युक्तीवाद केला. त्यात त्यांनी रामसुब्रमण्यम यांना किडनीचा आजार आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अखेर न्यायालयाने १५ दिवसांची मुदत रामसुब्रमण्यम यांना दिली.

Exit mobile version