एकाला अंधेरीत अटक
लॉकडाऊनच्या काळात आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून ई-पासची सुविधा करण्यात आली आहे. योग्यकारणा शिवाय ई-पास मिळत नसल्यामुळे अनेक जण पैसे देऊन ई-पास मिळवत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रत्येकी ४०० रुपये घेऊन ई-पास विकणाऱ्या एकाला अंधेरीच्या डी. एन.नगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. ई-पास विक्री प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्माचारी याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून लॉकडाऊन च्या काळात आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पास सुविधा करण्यात आली आहे. या ई-पास ची सुविधा पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र योग्य कारणाशिवाय ई-पास मिळत नसल्यामुळे काही जणांनी ई पासचा बाजार मांडला आहे. मीरा रोड येथून एक इसम ४००रुपये घेऊन ई-पास देत असल्याची माहिती डी एन नगर पोलिसांना मिळाली.
हे ही वाचा:
वाझेपाठोपाठ एपीआय रियाझ काझीचीही गच्छंती
शरद पवारांना घरी लस, मग ज्येष्ठ नागरिकांना का नाही?
धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट
हवेत गेलेले पाय जमिनीवर आलेलं बघून बरं वाटलं
यामहितीच्या आधारे पोलिसांनी आमिर इम्तियाज मुंसी (३१) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता अमीर हा प्रत्येकी ई-पाससाठी ४०० रुपये घेत होता. त्याने आतापर्यंत जवळपास ५००जणांना हे पास विकले असल्याची माहिती त्याने पोलिसाना दिली.
अमीर याला हे ई पास जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारा व्यक्ती आणून देत होता. प्रत्येकी पास मागे तो माणूस ३०० रुपये घेत होता व १०० रुपये अमीर ला मिळत होते, अशी माहिती अमीरने दिली आहे. याप्रकरणी अमीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ई-पास पुरवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.