तरुणाईला भुरळ घालणाऱ्या ई-सिगारेटचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण पथकाच्या या कारवाईचे कौतुक करण्यात येत असले तरी ई-सिगारेट ऑनलॉइन बाजारात सर्रासपणे उपलब्ध होत आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार का? असा सवाल सामान्य मुंबईकराकडून विचारला जात आहे.
मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशातील तरुणांना भुरळ घालणारे ई-सिगारेट भारतात मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. देशातील मुख्य बाजारपेठा, ऑनलाइन, तसेच शहरातील पान टपऱ्यावर ई-सिगारेटची सर्रासपणे विक्री होत आहे. अगदी शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते कॉलेज तरुणांमध्ये ई-सिगारेटची क्रेझ निर्माण झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक सिगारेटमध्ये विशिष्ठ प्रकराचे निकोटीन युक्त रसायन मिसळून त्याच्या धुरात तरुणाई धुंद झाली आहे. या ई-सिगारेटवर केंद्र शासनाने २०१९ मध्ये बंदी आणलेली असताना, देखील मोठ्या प्रमाणात हे ई सिगारेट कुठल्या न कुठल्या मार्गाने भारतात येत आहे. मुंबईत कॉलेज व शाळकरी विद्यार्थी यांच्यात ई-सिगारेट ओढण्याचे प्रमाण खूप मोठे आहे.
हे ही वाचा:
परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!
श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी
‘झुंड’ चित्रपटातील बाबूला नागपूर पोलिसांनी केली अटक
माहिती विकणाऱ्यांचा लावला छडा, दोघांना अटक
मागील काही महिन्यापासून मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण विभागाने ई-सिगारेट विरोधी मोहीम राबवली आहे. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि त्यांच्या पथकाने आग्रीपाडा येथील सात रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ई-सिगारेटचा घेऊन निघालेल्या वाहनावर कारवाई केली आहे. त्यात पोलिसांनी सुमारे ५८ लाख ५० हजार रुपये किमतीचे ई- सिगारेटच्या साठ्यासह एकाला अटक केली आहे. नोमान मोईउद्दीन खान (२६) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसानी साडेपाच हजार नग ई-सिगारेट जप्त केले आहे. क्राइम ब्रांचने कंट्रोल विभागाने मागील जुलै महिन्यापासून केलेली ही १९ वी कारवाई असून याप्रकरणी १९ जणांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तसेच लाखो रुपयांचा इ-सिगारेटचा साठा ही जप्त करण्यात आला असल्याची माहिती नितीन पाटील यांनी दिली.