25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामाबेंगळुरूत नफरत की दुकान? डच पर्यटकाचा हात मुरगाळून धाक दाखवला

बेंगळुरूत नफरत की दुकान? डच पर्यटकाचा हात मुरगाळून धाक दाखवला

कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपीची ओळख सापडली आहे

Google News Follow

Related

बेंगळुरू येथे एका नेदरलँड्सच्या यूट्युब ब्लॉगरला धमकावल्याप्रकरणी नवाब हयाथ शरीफ नावाच्या इसमाविरुद्ध कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातील व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नफरत की दुकान बंद करून आम्ही मोहोब्बत की दुकान उघडण्यासाठी आलो आहोत, असे म्हटले होते. त्याचा आधार घेऊन सोशल मीडियावर लोकांनी सवाल उपस्थित केला की, हे मग नफरत की दुकान आहे का?

 

बेंगळुरू येथील चिकपेट या प्रसिद्ध बाजारपेठेत ही घटना घडली. पेड्रो मोटा हा डच यूट्युबर तिथे व्हीडिओ चित्रण करत फिरत होता. तेवढ्यात नारंगी रंगाच्या शर्टमधील नवाब नावाच्या व्यक्तीने पेड्रोचा हात धरला आणि तो मुरगळण्याचा प्रयत्न केला.

 

पेड्रो हा या गर्दी असलेल्या बाजारपेठेत शिरला आणि काहीतरी बोलत पुढे चालला होता. तेवढ्यात नवाबने त्याला अडवले. तेव्हा नमस्ते असे तो म्हणाला. तेव्हा नवाबने त्याला क्या नमस्ते, क्या है ये असे विचारत त्याचा डावा हात धरला आणि मुरगाळण्याचा प्रयत्न केला. नवाबने त्या यूट्युबरचा हात घट्ट धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा पेड्रोने हात सोडवत पुढे पळ काढला.

हे ही वाचा:

‘नितीशकुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’

फेडरर, नदालला पराभूत करण्यासाठी काय करावे लागेल, याचा सतत विचार केला!

‘संस्कारी, देशप्रेमी, सुदृढ बाळ हवंय, मग रामायण वाचा’

भारताच्या पराभवानंतर गावस्कर संतापले

सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाला असून पेड्रोनेच तो अपलोड करून आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाविषयी लोकांना माहिती दिली. पेड्रोने त्या व्हीडिओखाली लिहिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मी बाजारपेठेत फिरत असताना एका माणसाने माझा हात पकडला आणि मला रागाने विचारू लागला. माझा हातही त्याने मुरगाळण्याचा प्रयत्न केला पण कसेबसे मी सुटका करून घेतली.

बेंगळुरू पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून कोणत्याही परदेशी पर्यटकाविरोधात अशाप्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. जे घडले त्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक पोलिस कायद्यानुसार कलम ९२च्या अंतर्गत या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा