25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाबीरभूम हिंसाचाराच्या तपासादरम्यान सापडले क्रूड बॉम्ब

बीरभूम हिंसाचाराच्या तपासादरम्यान सापडले क्रूड बॉम्ब

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये आठ जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी सीबीआय कारवाई करत आहे. मात्र या कारवाईदरम्यान एक वेगळीच घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये ४० देशी बनावटीचे बॉम्ब सापडले आहेत. हे बॉम्ब चार बादल्यांमध्ये लपवून एका बांधकाम सुरू असलेल्या घराच्या मागे लपवले होते. हे बॉम्ब पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बीरभूममधून पोलिसांनी आतापर्यंत १७० देशी बनावटीचे बॉम्ब जप्त केले आहेत. हे सर्व बॉम्ब जमिनीखाली गाडून ठेवले होते. कालच्या दिवशीही पोलिसांनी बोगटुई गावाला लागून असलेल्या मारग्राममधील एका बांधकामाधीन इमारतीतून क्रूड बॉम्बने भरलेल्या आणखी ४ बादल्या जप्त केल्या, ज्यात सुमारे ४० बॉम्ब होते. याशिवाय पोलीस बॉम्बच्या कच्चा मालचाही पाठपुरावा करत आहेत. आता या देशी बनावटीच्या बॉम्ब प्रकरणाचाही तपास सीबीआयने हाती घेतली आहे.

पश्चिम बंगालमधील बीरभूम हिंसाचार प्रकरणी सीबीआय कारवाई करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये रामपूरहाट ब्लॉक प्रमुख आणि टीएमसी अध्यक्ष अनरूल हुसैन, भादू शेख आणि त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांचा समावेश आहे. अनरूल हुसैन हा या जघन्य हत्येचा मास्टर माईंड असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणाचा तपास सुरु असून, सीबीआयने शनिवारी जळालेल्या घरांचे सर्वेक्षण केले. याशिवाय या भागातून संदर्भित कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या २१ आरोपींवर सीबीआयने कारवाई सुरू केली आहे.

हे ही वाचा:

चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

‘२४ महिन्यांत ३८ मालमत्ता! मुंबईला ते कसं लुटतात हे उघड झालं’

‘महाराष्ट्र बारव मोहीम’ सुरू करणाऱ्या रोहन काळेंच पंतप्रधान मोदींकडून कौतुक

तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षाच्या हत्येनंतर बागतुई येथे हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात जमावाने काही लोकांना घरात कोंडून बाहेरून आग लावली होती. यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ज्यामध्ये दोन मुले, तीन महिलांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा