‘गोली मारो’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

दिल्लीत मोहरमची मिरवणूक, पोलिसांशी झटापट, दगडफेक

‘गोली मारो’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार उसळल्याच्या एका दिवसानंतर रविवारी नांगलोई पोलिस ठाण्याबाहेर ‘गोली मारो’च्या घोषणा देण्यात आल्या. पश्चिम दिल्लीतील नांगलोई येथे मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या जमावाची पोलिसांशी झटापट झाल्यानंतर एका दिवसानंतरही या भागात तणाव वाढत गेला. उजव्या विचारसरणीच्या गटाच्या सदस्यांनी नांगलोई पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने, घोषणाबाजी करत कथित दंगलखोरांना अटक करण्याची मागणी केली.   ‘देश के गद्दार को, गोली मारो’च्या घोषणा देत सुमारे अर्धा तास ही निदर्शने चालली. तसेच, ‘जय श्री राम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कर्मचारी घटनास्थळी होते. दिल्लीच्या नांगलोई परिसरात शनिवारी संध्याकाळी मोहरमच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला, परिणामी अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाठीमार केला, असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अजूनही शिल्लक १९९९चे प्रकरण

अतिक अहमदला आव्हान देणाऱ्या ‘सपा’च्या आमदार पूजा पाल भाजपमध्ये जाणार ?

पवार काहीही म्हणाले तरी महाराष्ट्रात २४-२४ अशक्य

पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडून आणखी काही दिवसांची मुदतवाढ

पोलिस उपायुक्त (बाह्य) हरेंद्र सिंग यांच्या म्हणण्यानुसार, काही ‘ताजिया’ मिरवणूक आयोजकांनी पूर्वी ठरलेल्या मार्गावरून त्यांची मिरवणूक वळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हाणामारी सुरू झाली. मिरवणूक वळविण्यास आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दगडफेकीमुळे सहा पोलिस कर्मचार्‍यांसह १२ जण जखमी झाले.

‘पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपाले जात आहे आणि शनिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या घटनांचे व्हिडिओ विश्लेषण सुरू आहेत. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत,’ अशी माहिती हरेंद्र सिंग यांनी दिली.

Exit mobile version