दुर्गाष्टमीचा पूजापाठ पोलिसांनी घरात घुसून केला बंद, स्थानिकांकडून संताप!

भांडुपच्या पठाण कॉलनीतील घटना, अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी

दुर्गाष्टमीचा पूजापाठ पोलिसांनी घरात घुसून केला बंद, स्थानिकांकडून संताप!

देशासह राज्यभरात दुर्गाष्टमीचा उत्साह सुरु असून सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण आहे. भक्तांकडून मनोभावे देवीची नऊ दिवस पूजा, उपासना, भजन म्हटले जात आहे. याच दरम्यान, भांडूपमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुर्गाष्टमीनिमित्त सुरु असलेला पूजा पाठ बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे सर्व पोलिसांकडून करण्यात आले आहे. यावरून स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात असून पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली जात आहे.

भांडुपच्या पठाण कॉलनीतील ही घटना आहे. या प्रकरणी स्थानिकांनी भांडूप पोलीस ठाण्यात काल (८ ऑक्टोबर) तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, एकता पोलीस चौकीच्या शेजारील तबेला जवळच दुपारी १ च्या सुमारास एका हिंदू घरात ‘माता की चौकी’ आणि एका घरात नवरात्रीचे ‘भजन’ सुरु होते.

हे ही वाचा : 

‘हरियाणा जिंकले, आता महाराष्ट्र जिंकायचाय’

ठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकुट

काँग्रेसचे म्हणजे जिंकता येईना ईव्हीएम वाकडे

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर ठेवल्या ‘सिमेंट स्लीपर’

स्थानिकांनी न्यूज डंकाला दिलेल्या माहितीनुसार, भजनकीर्तन सुरु असताना पोलिसांनी अचानक घरात शिरकाव करत भजन थांबवले. यावरून पोलिसांना जाब विचारला असता, याबाबत तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. असा कोणता समाज आहे?, ज्याला आमच्या भजनाचा त्रास होत आहे, त्यामुळे पोलिस आमच्या घरातील भजनावर बंदी आणत आहे, असा सवाल स्थानिकांनी यावेळी उपस्थित केला. अशा प्रकारच्या पोलिसांच्या कारवाईमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

तक्रारीनुसार, स्थानिकांनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच हिंदूंच्या श्रद्धेशी छेडछाड करणाऱ्यांनी माफी मागावी आणि पठाण कॉलनीतील सर्व भक्तांना न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Exit mobile version