उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये दुर्गा मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत गोंधळ माजल्याचे समोर आले आहे. विसर्जन मिरवणुकीत संगीत वाजवण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर, परिसरात तणाव निर्माण झाला. लोकांनी अनेक वाहनांना आगही लावली. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. सध्याच्या एसपी वृंदा शुक्ला यांनी निष्काळजीपणाच्या आरोपावरून हरदी पोलिस स्टेशनचे एसओ आणि महसीच्या चौकी इन्चार्जला निलंबित केले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे.
बहराइचच्या महराजगंज बाजार परिसरातून मिरवणूक जात असताना डीजे वाजवण्यावरून दोन समुदायांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर काही वेळातच या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाल्याची माहिती आहे. काही लोकांनी छतावरून दगडफेक सुरू केली आणि आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये राम गोपाल मिश्रा नावाच्या तरुणाला गोळी लागली. या घटनेत १५ हून अधिक जण जखमीही झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी राम गोपाल यांना मृत घोषित केले.
जनपद बहराइच के महसी में माहौल बिगाड़ने वालों को बख्शा नहीं जाएगा।
सभी को सुरक्षा की गारंटी, लेकिन उपद्रवियों और जिनकी लापरवाही से घटना घटी है, ऐसे लोगों को चिह्नित कर कठोरतम कार्रवाई के निर्देश दिए हैं।
प्रतिमा विसर्जन जारी रहेगा। प्रशासन और पुलिस के अधिकारियों को मौके पर…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 13, 2024
हे ही वाचा:
ट्रम्प यांच्या कॅलिफोर्नियाच्या कोचेलामधील रॅलीजवळून सशस्त्र व्यक्तीला अटक
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्येत रियल इस्टेटमधील बड्या विकासकाच्या नावाची चर्चा
बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’
बाबा सिद्दीकी हत्या: आरोपीची आजी म्हणते, ‘चौकात उभे करून गोळी घाला’
राम गोपाल मिश्रा याच्या मृत्यूची बातमी समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी तोडफोड, जाळपोळ करायला सुरवात केली. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्याचवेळी ग्रामस्थांनी राम गोपाल याचा मृतदेह मेडिकल कॉलेजसमोर रस्त्यावर ठेवला आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. इतर ठिकाणीही विसर्जन यात्रा थांबवण्यात आली. या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली असून वातावरण बिघडवणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. गैरप्रकार करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.