मित्राचा मृतदेह सुटकेस मधून तुतारी एक्सप्रेसने निघालेल्या एकाला दादर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन पायधुनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पायधुनी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी हा मूकबधिर असून त्याने आणखी एका मूकबधिर मित्राच्या मदतीने मुलीच्या प्रेमप्रकरणातून कुर्ल्यात राहणाऱ्या मूकबधिर तरुणाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघाले होते अशी माहिती पायधुनी पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करून या हत्येप्रकरणी दोन मूकबधिर तरुणांना अटक केली.
जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.अर्षद अली सादिक अली असे मृत तरुणाचे नाव आहे. हे तिघे ही मूकबधिर आहेत आणि ते सांकेतिक भाषेचा वापर करून संवाद साधतात. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी सांकेतिक भाषा तज्ज्ञाला बोलावले, त्यानंतरच हत्येचे कारण स्पष्ट झाले.
पायधुनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून या प्रकरणात
कुर्ला येथे राहणाऱ्या अर्शद शेखच्या हत्येत या दोघांचा सहभाग होता. हत्येनंतर संशयित मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुतारी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करत होते. पोलिस पथकाने संशयास्पद बॅगची तपासणी सुरू केली, जिथे त्यांना मृतदेह सापडला. दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा:
भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !
गिरगावात भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
बांगलादेशातील सत्तापालटानंतर बीएसएफकडून सर्व सीमेवर ‘हाय अलर्ट’
लाडकी बहीण योजनेविरोधात हस्तक्षेप नाही म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली
एका संशयिताला स्थानकात अटक करण्यात आली, तर दुसरा घटनास्थळा वरून पळून गेला होता त्यालाही अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपी आणि मृत अर्षद यांच्यात प्रेयसीवरून भांडण झाले होते. यानंतर संशयितांनी अर्षद पायधुनी येथील किका रस्त्यावरील त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावले. पार्टी सुरू असताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संशयितांनी ते एका सुटकेसमध्ये भरले आणि ते घेऊन निघून गेले. काहीही दिसू नये म्हणून मृतदेह पूर्णपणे प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी बॅग तपासणी मोहिमेदरम्यान त्यांना पकडले.