भांडणातून पुत्राने पित्याच्या वाहनाला कार ठोकली; चार जण जखमी

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

भांडणातून पुत्राने पित्याच्या वाहनाला कार ठोकली;  चार जण जखमी

पिता आणि पुत्रात असलेले वैर मंगळवारी अंबरनाथ येथील एका घटनेत समोर आले आहे. भरधाव वेगात असलेल्या पुत्राने स्वतः चालवत असलेली मोटार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वडिलांच्या मोटारीवर चढवली, या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अंबरनाथ येथील चिखोली गावात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा थरार एकाने आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

अंबरनाथ चिखोली गावात सायंकाळी साडेसहा वाजता बिंदेश्वर शर्मा आणि त्यांचा मुलगा सतीश हे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावरून वेगवेगळ्या मोटारीने जात होते, बिंदेश्वर एका पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये होता त्यात कुटुंबातील इतर सदस्यही बसले होते; काळ्या टाटा सफारीत सतीश त्याच्या मागे जात होता.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर आंदोलनात कसे काय झळकले?

आरजी कार हॉस्पिटलच्या माजी प्राचार्यांकडून बेवारस ‘मृतदेहांची विक्री’

टिकैत म्हणतात, आम्ही २५ लाख शेतकऱ्यांना संसदेच्या दिशेने घेऊन जायला हवे होते !

पाकिस्तानी संसदेत आता ‘बंदोबस्ता’साठी मांजरींची नियुक्ती

सतीशने आधी त्याच्या वडिलांच्या कारला मागून धडक दिली, त्यानंतर पुढे जाऊन मोटार वळवली आणि हॉटेल S3 पार्कसमोर थांबण्यापूर्वी गाडीच्या समोरासमोर धडक दिली. प्रथम कारला धडक दिल्यानंतर, जेव्हा ड्रायव्हरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दार उघडले, तेव्हा त्याने त्याला आणि त्याच्याजवळ बसलेल्या एका अल्पवयीन मुलाला दुखापत केली. त्यानंतर दुचाकीवर आलेल्या स्थानिकाला त्यांची धडक झाली. सतीशने त्याच्या वडिलांच्या वाहनाला समोरासमोर जाण्यासाठी यू-टर्न घेतला तेव्हा तो व्यक्ती बोनेटवरून खाली पडला, त्याला सतीशच्या मोटारीने ५० फूट फरफटत नेले, या अपघातात दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला, तर दुचाकीस्वारही दुचाकीवरून खाली पडला आणि त्याला किरकोळ दुखापत झाली.

अंबरनाथ पोलिस ठाण्यातील पोलिसांनी बिंद्धेश्वर यांचा मुलगा सतीश याच्या विरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार वडिलांचे वय सुमारे ६२ आहे तर त्यांचा मुलगा ३८ वर्षांचा आहे. त्यांनी असेही सांगितले की बिंदेश्वर हे त्यांच्या बदलापूर येथील निवासस्थानातून कुलाब्याला जात होते, तर त्यांचा मुलगा वेगळ्या मोटारीने त्यांचा पाठलाग करत होता. पिता-पुत्रात वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.जखमींना स्थानिकांनी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

Exit mobile version