पोलिसांना वाटले धमकीचा कॉल, पण लक्षात आले तेव्हा डोक्यावर हात मारून घेतला

अखेर पोलिसांचा जीव भांड्यात पडला

पोलिसांना वाटले धमकीचा कॉल, पण लक्षात आले तेव्हा डोक्यावर हात मारून घेतला

मुंबईत निनावी धमकीचा कॉलमुळे पोलीस यंत्रणा पुरती हैराण झालेली असताना बुधवारी पुन्हा एकदा पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली पण नंतर सगळे प्रकरण समोर आले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

‘क्रॉस कनेक्शन’मुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मात्र हा निनावी कॉल क्रॉस कनेक्शन असल्याचे समोर आल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

मागील एका आठवड्यापासून मुंबईला उडवून देण्याऱ्या धमकीच्या निनावी कॉलने मुंबईत खळबळ उडवून दिलेली असताना बुधवारी जुहू येथील इस्कॉन मंदिराचे सर्वेश कुमार यांना एक निनावी कॉल आला होता. कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तीने “सब तयार है ना, मै १७ तारीख को आ रहा हु, युसूफ को मिल लिया? शक हो गया” असे बोलून कॉल कट केला आहे.
हल्ल्याच्या धमकीचा कॉल समजून सर्वेश कुमार यांनी मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाला ही माहिती मिळताच संपूर्ण मुंबई पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि इस्कॉन मंदिर आणि परिसरातील सुरक्षा वाढवून तपासणी सुरू करण्यात आली.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी लोकसभेत काँग्रेसला पात्रता दाखविली!

काँग्रेसवाल्यांनो, इल़ॉन मस्कने केला तर चमत्कार अदाणींनी केला तर बलात्कार?

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?

दुसरीकडे हा कॉल कोणी केला याचा तपास सुरू करण्यात आला असता या तपासात जी माहिती पोलिसांसमोर आली ती ऐकून पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला, झाले असे की ज्या निनावी नंबर वरून कॉल आला होता, त्या व्यक्तीला भोपाळ येथे कॉल करायचा होता, मात्र कॉलचे क्रॉस कनेक्शन झाले आणि सर्वेश यांच्या मोबाईलवर हे क्रॉस कनेक्शन जोडले गेले,आणि क्रॉस कनेक्शन लागल्याचे कळताच समोरच्या व्यक्तीने कॉल कट केला.

परंतु क्रॉस कनेक्शन वरील अर्धवट संभाषण ऐकून आणि मध्येच कॉल कट झाल्यामुळे हा कॉल दहशतवाद्याचा असावा असा गैरसमज होऊन सर्वेश कुमार यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. क्रॉस कनेक्शनमुळे उडालेला गोंधळामुळे मात्र पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Exit mobile version