गुजरातमधून ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरात पोलिसांची कारवाई

गुजरातमधून ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त

गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये पोलिसांनी तब्बल ८० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे ८० किलोचे कोकेन असून याची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे.

एनएआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी किनारपट्टी भागातून तब्बल ८० किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. या ८० किलो कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८०० कोटी रुपये इतकी आहे. पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून या ड्रग्जची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरु केला. त्यांनी तपास केला असता यावेळी पोलिसांच्या भीतीने आरोपींनी अंमली पदार्थ समुद्रातच टाकून घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच पोलिसांच्या भीतीने तस्करांनी अंमली पदार्थ घटनास्थळी टाकून पळ काढला. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, “गांधीधाम पोलिसांनी ८० किलो कोकेन जप्त केलं, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ८०० कोटी रुपये आहे. या यशाबद्दल डीजीपी आणि गांधीधाम पोलिसांचे अभिनंदन करतो.”

हे ही वाचा:

जखमी श्वानाच्या मालकाचा रतन टाटा घेताहेत शोध

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत

पोलिसांनी माहिती देत सांगितलं की, गांधीधाम शहराजवळील खाडीच्या काठावर ८० पॅकेटमध्ये कोकेन सापडलं आहे. प्रत्येक पॅकेटचे वजन एक किलोग्रॅम आहे. कच्छ-पूर्व विभागाचे पोलीस अधीक्षक सागर बागमार यांनी सांगितलं की, कदाचित पकडले जाण्याच्या भीतीने तस्करांनी येथे ड्रग्ज टाकून पळ काढला असावा, कारण पोलीस या ठिकाणी लक्ष ठेवून होते.

Exit mobile version