मध्य प्रदेशातील भोपाळजवळील एका कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा सापडला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) गुजरात यांनी संयुक्त कारवाईत अंदाजे १,८०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
या छाप्यात एमडी (मेफेड्रोन) औषध जप्त करण्यात आले, जे कारखान्यात तयार केले जात होते. बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या उत्पादनाप्रकरणी अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना अटक केली आहे. ड्रग्जविरोधी कारवाई केल्याप्रकरणी गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस पथक करत आहे.
हे ही वाचा :
चेंबूरमध्ये भीषण आगीत सात जणांचा मृत्यू
‘महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांना खुपला’
जम्मू-काश्मीर: निकालापूर्वी दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला, शस्त्रे-स्फोटके जप्त!
इस्रायलचा गाझामधील मशिदीवर हवाई हल्ला, १८ ठार!
दरम्यान, दिल्लीमधून नुकतेच ५,००० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली होती. बुधवारी (२ ऑक्टोबर) दक्षिण दिल्लीत टाकलेल्या छाप्यात ५,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ५०० किलो कोकेन आणि ४० किलो हायड्रोपोनिक गांजा पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी तुषार गोयल (४० ), जितेंद्र पाल सिंग, उर्फ जस्सी (४० ), हिमांशू कुमार (२७ ), औरंगजेब सिद्दीकी (२३ ) आणि भरत कुमार जैन (४८ ) या पाच जणांना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड तुषार गोयल असल्याची माहिती आहे.