मुंबईतील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) पार्ले येथील पोस्ट ऑफिसमधून एलएसडी या अंमली पदार्थाचे ८० ब्लॉट्स जप्त केले आहेत. हे व्यावसायिक प्रमाण मानले जाते. या ब्लॉट्सची किंमत अंदाजे, अडीच लाख रुपये वर्तवली जात आहे. हे तुकडे का कागदात गुंडाळलेले आढळले, ज्या कागदावर ऍडॉल्फ हिटलरबाबत लिहीलेले होते. हा कागद एका पाकिटात, घातलेला आढळला होता.
एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समिर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या हाती नक्की खबर मिळाल्यानंतर, त्याच्या आधारे एनसीबीने कारवाई केली. विले पारले पूर्व येथील पोस्ट ऑफिसातून त्यांनी ८० तुकडे जमा केले.
हे ही वाचा:
टाळेबंदीच्या धास्तीने मुंबईकरांची जास्तीची खरेदी
बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक
तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?
स्पुतनिक-५ च्या आयातीला आणि वापराला परवानगी
”या प्रकरणामध्ये तरुणांनी डार्क नेटच्या माध्यमातून हे एलएसडी खरेदी केलं होतं. याची किंमत बिटकॉईन सारख्या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून चुकती करण्यात आली होती. युरोपियन देशातून एलएसडीची आयात करण्यात येते. आम्ही याचा स्रोत आणि ग्राहक दोघांचा कसून शोध घेत आहोत.” अशी माहिती वानखेडे यांनी दिली.
एलएसडी हा एक शक्तीशाली अंमली पदार्थ आहे. याचे शास्त्रीय नाव लायसर्जीक ऍसिड डिथायलामाईड आहे. याच्या सेवनाने विविध तऱ्हेचे भास होतात. या पदार्थाने अनेक तऱ्हेचे मानसिक आजार देखील उद्भवतात. या पदार्थाला ८० विविध नावांनी देखील ओळखले जाते.