पाकिस्तानी बोटीतून जप्त केले ४०० कोटींचे हेरॉइन

पाकिस्तानी बोटीतून जप्त केले ४०० कोटींचे हेरॉइन

गुजरातमध्ये भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले. भारताच्या जल हद्दीत सहा जणांना ताब्यात घेतले असून एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना गस्त घालत असताना रविवारी १९ डिसेंबरच्या रात्री ही बोट गुजरात किनारपट्टीवर आढळली.

कारवाईमध्ये ‘अल हुसैनी’ ही पाकिस्तानी मासेमारी बोट पथकाने ताब्यात घेतली. त्यावर असलेल्या सहा संशयितांना अटक कऱण्यात आली असून त्यांच्याकडून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत तब्बल ४०० कोटी रुपये इतकी आहे. पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली.

गुजरात सीमेवर घुसखोरांवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आणि एटीएसच्या संयुक्त मोहिमेवेळी पाकिस्तानी बोट अल हुसैनी आढळली. त्यानंतर जवानांनी तात्काळ बोटीवर कारवाई करत मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. बोटीवर असणारे सर्वजण हेरॉइनच्या तस्करीत होते.

हे ही वाचा:

माफी मागितली! आता पुन्हा बडबड सुरू…

मल्हार महोत्सव जपणार महाराष्ट्राची संस्कृती

‘घटिया आजम खान रोड’ झाला ‘अशोक सिंघल मार्ग’

सोने तस्करी करणाऱ्या १८ महिला विमानतळावर ताब्यात

यापूर्वीही गुजरातमध्येच अदानी समूहाकडे मालकी असलेल्या मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून हे अमलीपदार्थ आणले होते. या कन्टेनरमधून टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे, अशी कागदपत्रे दाखवण्यात आली होती.

Exit mobile version