लाकडांमध्ये लपवले होते ७०० कोटींचे हेरॉईन

लाकडांमध्ये लपवले होते ७०० कोटींचे हेरॉईन

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटारी सीमेवर मोठी कारवाई केली आहे. रविवारी, २४ एप्रिल रोजी एका ट्रकवर कारवाई करत हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. अमृतसरमध्ये अफगाणिस्तानातून पाकिस्तान चेकपोस्टवरून येणारा ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमधून तब्बल ७०० कोटींचे १०२ किलो हेरॉईन सापडले.

अफगाणिस्तानातून आयसीपी अटारी येथे आलेल्या ट्रकमध्ये गोणीत लाकडांसोबत हे ड्रग्ज लपवण्यात आले होते. तपासणी दरम्यान काही लाकडांवर डाग दिसल्यानंतर अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी आणि तपासणी केली असता लाकडांवर छोटे छिद्र दिसले.

त्यानंतर आतमध्ये हेरॉईन लपवण्यात आल्याचे समोर आले. या छिद्रांमधून तब्बल १०२ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. याची किंमत तब्बल ७०० कोटी इतकी आहे. ही हेरॉईन दिल्लीतील एका आयातदाराने अफगाणिस्तानातून येणाऱ्या दारूच्या खेपेत लपवून ठेवल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा:

‘राणा दाम्पत्यांची केसच बोगस’

गुवाहाटी महापालिका निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ५८ जागा जिंकल्या

‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न

कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये

यापूर्वी २०१९ मध्ये आयसीपी अटारी येथे ५८४ किलो हेरॉईन पकडण्यात आली होती. दारूची ही खेप अफगाणिस्तानमधून दिल्लीतील व्यापाऱ्याकडे पाठवण्यात आली होती.

Exit mobile version