समाजवादी पार्टीचे उमेदवार अबू आजमीच्या कार्यालयात ड्रग्सचा अड्डा? व्हीडिओ व्हायरल

नवाब मलिक- अबु आझमी यांच्यातील संघर्ष

समाजवादी पार्टीचे उमेदवार अबू आजमीच्या कार्यालयात ड्रग्सचा अड्डा? व्हीडिओ व्हायरल

समाजवादी पार्टीचे उमेदवार तसेच विद्यमान आमदार अबू आजमी याचे मानखुर्द -शिवाजी नगर येथील कार्यालय अमली पदार्थाचा अड्डा बनला आहे.आझमी यांच्या कार्यालयातील ड्रग्स पार्टीचा एक व्हिडिओ ‘एक्स’ वर ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नवाब मलिक यांच्याच्या एक्स खात्यावरून ट्विट केला आहे,त्याच सोबत तेथील नागरिकांना एक संदेश देखील दिला असून या संदेश मध्ये मलिक यांनी ,मुलांना सपा पासून दूर ठेवण्यापासून नागरिकांना सावध केले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी कच्छमधील बीएसएफ जवानांसोबत साजरी केली दिवाळी

सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण

आमदार जयश्री जाधवांचा काँग्रेसला रामराम; शिवधनुष्य घेतले हाती

वन नेशन, वन इलेक्शन लवकरच लागू होणार

मानखुर्द -शिवाजी नगर विधानसभा मतदार संघातून समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार अबू आजमी पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहे, त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँगेस पार्टी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी मानखुर्द – शिवाजी नगर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदार संघात मलिक आणि आजमी हे दोघे आमने सामने लढत आहे. काही दिवसांपूर्वी मलिक यांनी मानखुर्द -शिवाजी नगर हे ड्रग्स मुक्त करू अशी घोषणा केली होती.

मलिक यांनी केलेल्या घोषणेनंतर मानखुर्द शिवाजी नगर मध्ये अमली पदार्थचा फैलाव कुठून आणि कसा होत आहे, याचा पुरावा म्हणून विरोधक अबू आझमी यांच्या मानखुर्द शिवाजी नगर येथील कार्यालयात सुरू असलेल्या अमली पदार्थ सेवणाचा एक व्हिडिओ ‘एक्स’ वर ट्विट केला आहे, सोबत त्यांनी एक संदेश पोस्ट केला आहे. या संदेशात त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे, “सावधान! जनहित में जारी,अपने बच्चों को सपा से दूर रखें!सपा कार्यालय बना नशे का अड्डा!, पोस्ट केलेल्या व्हिडीओ मध्ये समाजवादी पक्षाचे स्थानिक आमदार अबू आजमी यांचे कार्यालय असून या कार्यालयात एक टोळी एमडी (मफेड्रोन) या सारख्या अमली पदार्थाची नशा करताना आढळून येत आहे. या व्हिडीओने मानखुर्द शिवाजी नगर परिसरात खळबळ उडवून दिली असून पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत तपास सुरू केला आहे.

Exit mobile version