ड्रग्सच्या तस्करीसाठी बांगड्या, हेल्मेट, स्टेथोस्कोप !

ड्रग्सच्या तस्करीसाठी बांगड्या, हेल्मेट, स्टेथोस्कोप !

मुंबईतून परदेशात ड्रग्सची तस्करी करण्यासाठी डॉक्टरचे स्टेथोस्कोप, बांगड्या, हेल्मेट, मायक्रोओव्हन, इत्यादींचा सर्रास वापर केला जात असल्याचे एनसीबीने केलेल्या कारवाईत समोर आले आहे. एनसीबीच्या मुंबई विभागाने मुंबईतील अंधेरी आणि डोंगरी परिसरात केलेल्या पाच करवाईमध्ये तस्करी करण्याच्या या वस्तू समोर आल्या आहेत. या प्रकरणी एनसीबीने एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली असून सुमारे १३ कोटींचा ड्रग्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून एनसीबीच्या मुंबई विभागाच्या अंधेरी आणि डोंगरी परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू होती. या दरम्यान केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत एनसीबीकडून अंधेरी येथे चार तर डोंगरी येथे एक अश्या पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. एका कारवाईत एनसीबीला ‘स्टेथोस्कोप’ मधून ४९०ग्राम अँफेटामाईन हा अमली पदार्थ मिळून आला. या प्रकरणी एनसीबीने एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे.

या स्टेथोस्कोपमधून आस्ट्रोलीया या देशात ड्रग्सची तस्करी होणार होती. दरम्यान इतर तीन कारवाई अंधेरी येथेच करण्यात आली आलेल्या प्रत्येकी कारवाईत मायक्रोओव्हन, बांगड्या, हेल्मेट या वस्तू ताब्यात घेऊन तपासल्या असता त्यात अफू, अँफेटामाईन,झोलपीडेम टॅबलेट मोठ्या प्रमाणात मिळून आले आहे. या सर्व वस्तू मध्ये अमली पदार्थाची अमेरिकेतील टेक्साक्स, आस्टोलिया, दुबई, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड या देशात त्यांची तस्करी करण्यात येणार होती.

हे ही वाचा:

सात महिन्यांच्या संसारात शिरले संशयाचे भूत आणि झाले असे विपरित…

सोनियांच्या घरी शरद पवार भेटीला

मिस युनिव्हर्स हरनाजला मिळणार या उत्तमोत्तम सुविधा आणि घसघशीत कमाई!

एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

 

हे सर्व अमली पदार्थाची मुंबईतील डोंगरी परिसरातून तस्करी करण्यात येत होती, खाजगी कुरिअर कंपनी मार्फत परदेशात अमली पदार्थ भरलेल्या वस्तू पाठवण्यात येत होती अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली. दरम्यान एनसीबीने डोंगरी येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी खेळण्याच्या बॉक्स मध्ये नळ्यामध्ये अँफेमेटाईन हा ड्रग मिळून आला आहे. या पाचही कारवाईत जप्त करण्यात आलेला अमली पदार्थांची किंमत १३ कोटीच्या जवळपास असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली.

Exit mobile version