सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन केनियन महिलांना अटक
‘कोकेन’ अंमली पदार्थाच्या तस्करीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन केनियन महिलांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये एनसीबीला गुप्तांगात कोकेन ऐवजी सोने मिळून आले आहे. या तिघीजणी ड्रग्स तस्कर नसून सोन तस्करी करणाऱ्या टोळीच्या सदस्य असल्याचे समोर आल्याने एनसीबीने या तिघींचा ताबा हवाई गुप्तचर विभागाकडे दिला आहे.
मोहम्मद खुरेशी अली (६१), अब्दुल्लाहि अब्दीया अदान (४३) आणि अली सादिया अल्लो (४५) असे अटक करण्यात आलेल्या सोन तस्कर महिलांचे नावे आहेत. या तिघी केनियन नागरिक आहेत. तीन केनियन महिला दोहा येथून मुंबईकडे येत असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात कोकेन हा अंमली पदार्थ असल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने मंगळवारी मुंबई विमानतळावर सापळा रचून या तिघींना ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली, मात्र या तिघींकडे कुठलाही अमली पदार्थ मिळून आला नाही.
दरम्यान, या तिघीचे बॉडी स्कॅन करण्यात आली तरीही एनसीबीला तिघीच्या पोटात काहीही आढळून आले नाही. तिघीकडे चौकशी सुरू असताना तिघींचे अस्वस्थ वाटू लागल्याने तिघींची तातडीने जे,जे रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले, दरम्यान या तिघीची वैद्यकीय चाचणी मध्ये या तिघीच्या गुप्तांगात सोन्याचे पाकिटे मिळून आली.
हे ही वाचा:
आरटीओ विभागातही ‘रहदारी’ची कोंडी
उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करा
अबब!! एकाच वॉर्डातील कचऱ्याच्या डब्यासाठी दोन कोटी
या तिघींची सोन तस्करी करण्यासाठी शरीराच्या या अवयवचा वापर करून सुमारे ९३७.७८ ग्राम वजनाचे एकूण १३ पाकिटे त्यात १७ सोन्याचे तुकडे मिळून आले. प्रत्येक पाकिटात २० ग्राम पासून १०० ग्राम पर्यत सोन्याचे तुकडे होते, अशी माहिती एनसीबीने दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघी ड्रग्स तस्कर नसून सोन तस्कर असल्याचे कळल्यानंतर एनसीबीने या तिघींचा ताबा हवाई गुप्तचर विभाग (कस्टम) यांच्याकडे दिला आहे.