गुजरातमधील देवभूमी द्वारका येथून पोलिसांनी ३०० कोटींचे ड्रग्स जे पाकिस्तानातून आले होते ते हस्तगत केले असून या ड्रग्सच्या साठ्याचे मुंब्रा कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
८८ कोटींची १९ पाकिटे पोलिसांनी जप्त केली आणि नंतर त्यांना आणखी ४७ पाकिटे सापडली. पाकिस्तानातून सागरी मार्गाने हे ड्रग्स गुजरातमध्ये दाखल झाले. द्वारकामधील किनारा मार्गाने त्याची तस्करी भारतात करण्याची योजना होती.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मुंब्र्यातील सज्जाद धोशी या माणसाला अटक केली आहे. त्याच्या बॅगमधून ड्रग्सची पाकिटे हस्तगत करण्यात आली. त्याच्या या पाकिटांत ६.६ किलो मिथेऍम्फटामाइन आणि ११.४ किलो हेरॉइन सापडले. त्यात इतर सामानही होते. या ड्रग्सची किंमत ८८.२ कोटी होती.
या माणसाची चौकशी केल्यावर तो भाजीविक्रेता असल्याचे कळले. त्याला सलीम याकुब कारा आणि अली याकुब कारा यांच्याकडून हे ड्रग्स मिळाल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही जामनगरमधील सलाया या भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरावरही धाडी टाकल्यानंतर त्यांच्याकडे ४७ पाकिटे सापडली.
हे ही वाचा:
भारताने चीनचे कोणतेही दावे स्वीकारलेले नाहीत
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?
नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत
धोशी हा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती असून एका खुनाप्रकरणी त्याला तुरुंगवासही झालेला आहे. सलीम कारा याला एनडीपीएस कायद्यांतर्गत बनावट चलन बाळगणे, अनधिकृत शस्त्र बाळगणे या प्रकरणात याआधी अटक करण्यात आलेली आहे.
गुजरातमधून ड्रग्स पकडण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. पण त्याचे कनेक्शन ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा असल्याचे समोर आले आहे.