आर्थर रोड कारागृहात चरस या अमली पदार्थाने भरलेली बॅग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा चरस तुरुंगात कोणी आणला याबाबत तपास सुरू असून तुरुंग प्रशासनाने या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात मंगळवारी पहाटे चरस हा अमली पदार्थ मिळून आला आहे.
पहाटेच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या कारागृह शिपायाला तुरुंगातील सर्कल क्रमांक ११ च्या बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज आला असता, कारागृह शिपायाने जवळ जाऊन बघितले असता, त्या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली संशया स्पद वस्तू आढळुन आली. त्यांनी ती पिशवी तपासली असता त्यात चरस हा अमली पदार्थ आढळून आला. शिपायांनी याबाबत वरिष्ठाना कळविले. तुरुंग अधिकारी आणि शिपायांनी संपूर्ण आर्थर रोड तुरुंगात चौकशी करण्यात आली, मात्र हा चरस कोणी आणला याबाबत काही कळू शकले नाही.
हे ही वाचा:
९३ वर्षांचे जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन
जी-२०च्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार गैरहजर
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
तुरुंग प्रशासनाने याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला आहे. पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार तुरुंगाच्या आत मिळून आलेला चरस हा अमली पदार्थ १३५ ग्राम वजनाचा असून कोणीतरी तो बाहेरून पिशवीला दगड बांधून भिंतीवरून तुरुंगाच्या आत भिरकावला असावा, त्याचा शोध घेण्यासाठी जवळपासचे सीसीटीव्ही तपासले जात असल्याची माहिती पोलिसानी दिली.