न्हावा शेवा बंदरात सापडलेले २५ किलो हेरॉइन आले अफगाणिस्तानातून

न्हावा शेवा बंदरात सापडलेले २५ किलो हेरॉइन आले अफगाणिस्तानातून

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटने नवी मुंबईतील न्हावा पोर्ट ट्रस्टमध्ये भुईमूग तेलाच्या कंटनेरमध्ये लपवलेली २५ किलो हेरॉईन जप्त केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असल्याचे समजते. या २५ किलो मालाची किंमत ही १२५ करोड रुपये आहे. तसेच हा माल अफगानिस्तानातून पाठविण्यात आल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. हा सर्व व्यवहार हवालामार्फत करण्यात आल्याचे समजते.

सध्याच्या घडीला राज्यामध्ये अमली पदार्थ येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. अमली पदार्थांची देवाणघेवाण मुंबईसारख्या शहरांमध्ये करोडोंच्या भावात होते. त्यामुळेच मिळालेल्या माहितीनंतर, डीआरआयच्या पथकांने ४ ऑक्टोबर रोजी बंदरावर झडप घातली. इराणहून येणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलाच्या डब्यांच्या बॉक्समध्ये १२५ कोटी रुपये किमतीचे प्रचंड अंमली पदार्थ आढळून आले. त्यामुळे हे मोठे रॅकेट असून, मोठी ड्रग्ज तस्करी यातून उघड झालेली आहे.

 

हे ही वाचा:

कोळसा संकटावर काय म्हणाले केंद्रीय ऊर्जा मंत्री?

काय होणार भारत-चीन दरम्यानच्या १३व्या चर्चेत?

धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार करणारे चार आरोपी मुंबई आणि इगतपुरीचे

दसऱ्याआधी पुण्यात पोलिसांनी ‘रावण’ला पकडले

 

इराणमधून आलेला हा माल दक्षिण मुंबईतील व्यावसायिक संदीप ठक्कर यांच्या नावावर भारतात आयात झाला. ठक्कर यांनी नवी मुंबईतील जयशे संघवी याला स्वतःचा आयात क्रमांक दिला होता. या बदल्यात मालासाठी त्याला दहा हजार रुपये देण्याचे आश्वास देण्यात आले होते. ठक्कर आणि संघवी गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांसोबत व्यवहार करत असल्यामुळे संघवी यांला ठक्कर यांनी आयात क्रमांक दिला. परंतु त्यांना माहीत नव्हते की यातून काय आणि कोणता माल येणार आहे. ठक्कर यांच्याशी बोलणे झाल्यानंतर, डीआरआयने संघवीला अटक केली आणि एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांखाली त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. आता सध्या संघवी याला ११ ऑक्टोबरपर्यंत डीआरआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version