26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाजम्मू-काश्मीरमध्ये अफगाणिस्तानातून ड्रग्जची तस्करी?

जम्मू-काश्मीरमध्ये अफगाणिस्तानातून ड्रग्जची तस्करी?

Google News Follow

Related

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता गुप्तचर संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये अफगाणिस्तानातून ड्रग्जची तस्करी वाढण्याचा इशारा दिला आहे. या अहवालानंतर, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कार्य दलाने सीमेपासून शहरापर्यंत पाळत ठेवणे आणि दक्षता वाढवली आहे.

आता तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आणि सरकार यशस्वी चालवण्यासाठी पैशांची गरज आहे. यावेळी जेव्हा जगाची नजर तालिबानवर असते आणि जगभरातील तालिबानवर निर्बंध लादले जात आहेत, अशा स्थितीत तालिबान पैशाची कमतरता पूर्ण करण्यासाठी ड्रग तस्करीला प्रोत्साहन देईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जर आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, याआधी १९९६ ते २००१ पर्यंत अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात होता तेव्हा अफगाणिस्तानमध्ये अफूचे उत्पादन शिगेला होते. आता असे मानले जात आहे की पैशांची कमतरता पूर्ण करण्यासाठी तालिबानने पुन्हा एकदा अंमली पदार्थांचं उत्पन्न वाढवलं आहे. तसेच हे ड्रग्स पाकिस्तानद्वारे भारतात पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल.

हे ही वाचा:

काबुल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका

तालिबानकडून ‘या’ पत्रकाराला मारहाण

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोचा चिखल

मालकासकट बाईक उचलणाऱ्या पोलिसाची उचलबांगडी

अफगाणिस्तानातून संभाव्य अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी या ऍक्शन प्लॅन अंतर्गत, बीएसएफ सेना सीमेवर दक्षता ठेवत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस जम्मू काश्मीरच्या आतील भागात देखरेख करत आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पारंपारिक मार्गावर लक्ष ठेवून आहे, जिथून ड्रग्जची खेप भारतात येण्याची शक्यता आहे. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने दावा केला आहे की पाकिस्तान ड्रोन्सचा वापर ड्रग्सच्या तस्करीमध्ये करू शकतो जे पाकिस्तानद्वारे पाठवले जाऊ शकतात. परंतु पाकिस्तानच्या बाजूने येणाऱ्या प्रत्येक अमली पदार्थ भारतीय सीमेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा