अमली पदार्थांच्या तस्करीत नायजेरियन लोक सर्वाधिक

१८ नायजेरियन नागरिकांना पोलिसानी घातल्या बेड्या

अमली पदार्थांच्या तस्करीत नायजेरियन लोक सर्वाधिक

ड्रॅग आणि नायजेरियन व्यक्ती हे समीकरण फार पूर्वीपासूनचे आहे. मुंब्रा पोलिसांनी मेफेड्रोन तथा एमडी या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरिअयन नागरिकास मागच्या आठवड्यात बेड्या ठोकल्या. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने वागळे परिसरात कोकेन विक्री करणाऱ्या दोन नायजेरियन तस्करांना नुकतीच अटक करण्यात आली. तर अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांच्या चौकशीतून ड्रॅग स्मगलिंग, इमेल ह्यॅकिंग, सोशल मीडिया अकाउंट ह्यॅकिंग, ऑनलाइन फसवणूक आदी गुन्ह्यात नायजेरियन व्यक्तींचा सर्वाधिक सहभाग असल्याचे दिसते. या संदर्भात ठाणे पोलिसांनी आठ महिन्यात १८ नायजेरियन नागरिकांना घातक ड्रॅग विक्री करताना पकडले.

नायजेरियन नागरिक भारतात पर्यटन व्हिसाच्या माध्यमातून प्रवेश मिळवतात. व हेच गुन्हेगार नायजेरियन नागरिक ठाण्यासह मुंबईत ड्रग्जचे जाळे विणत असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच मागील आठवड्यात दत्तूवाडी पेट्रोल पंपासमोर, मुंब्रा येथे मेफेड्रोन म्हणजेच एमडी या ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी तीन व्यक्ती येणार असल्याचे समजले, त्यावेळेची मुंब्रा येथे पोलिसांनी संपला रचून तिघांना अटक केली. व त्यांच्या कडून २६ ग्राम एमडी ड्रॅग जमा केले. पोलिसांनी एका आरोपीच्या मोबाईल वरून फोन करून आणखी ड्रॅग मागवले व त्याला सापळा रचून अटक केली. केलीचिकू ऍझे फ्रॅंसिस या नायजेरियन नागरिकांकडून ५५ ग्राम एमडी ड्रॅग हस्तगत करण्यात आले.

हे ही वाचा:

“शरद पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह”

पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव

पंतप्रधान मोदींच्या या १२०० वस्तूंचा होणार लिलाव

राडा करणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची शाबासकीची थाप

ठाणे गुन्हा शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने काही दिवसापूर्वी घोडबंदर रोड परिसरातून अटक केलेल्या नागरिकांनी आफ्रिका येथून भारतात तस्करी केलेल्या कोकेनसह मोफेड्रोन या ड्रग्जची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक केली असून डिक्सन चिडीबेरे इझे असे ड्रॅग पेडलरचे नाव असून, तो मुंबईतील चांदिवली, संघर्ष नगर येथे राहत होता. पोलिसांनी त्याच्याकडून २४७ ग्राम मेफेड्रोन पावडर असे १ कोटी १२ लाख रुपये किमतीचे ड्रॅग जप्त करण्यात आले. मुंबईसह ठाण्यात नायजेरियन व्यक्तींचा सर्वाधिक सहभाग असल्याचे दिसते.

Exit mobile version