ड्रग विकणाऱ्याने एनसीबीच्या अधिकाऱ्याला फरफटत नेले

ड्रग विकणाऱ्याने एनसीबीच्या अधिकाऱ्याला फरफटत नेले

एका विक्रेत्याला पोलिसांनी केले जेरबंद

अमली पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यासाठी गेलेल्या एनसीबीच्या एका अधिकाऱ्याला या विक्रेत्याने दोन किलोमीटर बाईकवरून फरफटत घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी पश्चिम येथे गुरुवारी उघडकीस आला. यामध्ये एनसीबीचा एक अधिकारी जखमी झाला असून एका अमली पदार्थ विक्रेत्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
अंधेरी पश्चिम वीरा देसाई रोड या ठिकाणी काही जण अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता.

हे ही वाचा:

वाझेपाठोपाठ एपीआय रियाझ काझीचीही गच्छंती

मिग-२१ चा पुन्हा अपघात, स्क्वाड्रन लीडरचा मृत्यू

नीतेश राणेंनी वादळग्रस्तांना दिली ५ हजार कौले आणि १ हजार पत्रे

धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट

त्या ठिकाणी दोन बाईक वरून तिघेजण आले असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आला. या तिघांना पकडण्यासाठी अधिकारी धावले असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना बघून तिघांनी बाईकवरून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यापॆकी एक बाईक एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पकडून ठेवली असता त्या बाईकस्वार ने तशीच बाईक पळवली, बाईक पकडून ठेवलेल्या अधिकारी देखील बाईकसह दोन किलोमीटर फरफटत गेला.
त्यानंतर या बाइकस्वाराने बाईक सोडून एका निवासी इमारतीकडे धाव घेतली, अधिकाऱ्याने जखमी अवस्थेत देखील त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पाठीमागून आलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ विक्रेत्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६२ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ मिळून आला. अटक करण्यात आलेल्या ड्रग्स सप्लायरकडून एनसीबीने ६४ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या इतर दोन साथिदारचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी वानखेडे यांनी दिली.

Exit mobile version