ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी केली होती मदत

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

साकीनाका ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ललित पाटीलच्या वाहन चालकाला अटक केली आहे. सचिन वाघ असे अटक करण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव असून सचिन वाघ हा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव वाखरी येथे राहणारा आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर सचिन वाघ याने त्याला मदत केली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सचिन वाघ हा सकिनाका ३०० कोटींच्या ड्रग्स प्रकरणातील १६ वा आरोपी आहे. सचिन वाघ याला सकिनाका पोलिसांनी बंगळुरू येथून त्याच्या स्कॉर्पिओ मोटारीसह ताब्यात घेऊन वाघला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

‘वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या वेबसिरीजमधून सावरकरांचा जीवनपट उलगडणार

भारताचा विजयी चौकार, शतकांची ‘विराट’ झेप

शरद पवार देशहिताचे, समाजहिताचे केव्हा बोलणार?

पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, वाघच्या अटकेनंतर साकी नाका पोलिसांनी ३०५ कोटी रुपयांच्या १५१ किलो मेफेड्रोन अमली पदार्थाप्रकरणी एकूण १६ जणांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ ६ ऑक्टोबर रोजी पाटील यांच्या नाशिक युनिटमध्ये जप्त करण्यात आले होते. सचिन वाघ याला कोठडी मिळविण्यासाठी शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर केले. अंमली पदार्थांच्या साठ्याबद्दल सखोल तपशील मिळविण्यासाठी सर्व बाजूने तपास केला जात आहे,” असे चौधरी यांनी सांगितले

Exit mobile version