लेडी ड्रग्स माफिया बेबी पाटणकरचा जामीन नाकारला, पण फरार

व्यावसायिकाने मुंबई गुन्हे शाखा येथे तक्रार अर्ज दाखल केला होता

लेडी ड्रग्स माफिया बेबी पाटणकरचा जामीन नाकारला, पण फरार

एका व्यवसायिकाची दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याच्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात मुंबईतील लेडी ड्रग्स माफिया बेबी पाटणकर हिचा सत्र न्यायालयाने अटक पूर्व जामीन फेटाळला आहे.जामीन फेटाळल्या नंतर फरार झालेल्या बेबी पाटणकरला अटक करण्यासाठी गुन्हे शाखा तिचा कसून शोध घेत आहे.

 

ड्रग्स माफिया शशिकला उर्फ ​​बेबी पाटणकर आणि तिचा साथीदार या दोघांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात फसवणुकी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका व्यवसायिकाकडून सोने देण्याच्या नावाखाली दोन कोटी रुपये उकळले होते, मात्र व्यवसायिकला सोन न देता त्याची फसवणूक करण्यात आली होती.

 

हे ही वाचा:

बिहारमध्ये जातिनिहाय गणनेत ८१ टक्के हिंदू, ६३ टक्के ओबीसी!

फडणवीस म्हणाले, राज्यात भाजपाच बॉस!

लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीला कांदिवलीतून अटक

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !

याप्रकरणी व्यावसायिकाने मुंबई गुन्हे शाखा येथे तक्रार अर्ज दाखल केला होता.या तक्रार अर्जावरून बेबी पाटणकर आणि परशुराम रामकिशन मुंढे यांच्यावर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा डाक करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी बेबी पाटणकर आणि तिच्या साथीदाराने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

 

 

या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली होती व तो पर्यत पाटणकर आणि तिच्या साथीदाराला अटक करू नये असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. दरम्यान शनिवारी या अर्जावर न्यायालयाने सुनावणी देत बेबी पाटणकर आणि तिच्या साथीदार मुंढे याना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. जामीन अर्ज नाकारल्यानंतर बेबी पाटणकर ही फरार झाली असून मंगळवारी ती उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे कळते. दरम्यान गुन्हे शाखेकडून बेबी पाटणकर आणि मुंढे यांचा शोध सुरू आहे.

Exit mobile version