इस्राइली व्यापारी जहाजावर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला

भारतीय नौदलाचे जहाज मदतीसाठी पोहचले

इस्राइली व्यापारी जहाजावर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला

अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतीय नौदल अलर्ट मोडवर आले आहे. हे जहाज इस्राइलचे असल्याचे माहिती असून या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली आहे. या जहाजावर २० भारतीय कर्मचारी आहेत. त्यांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाने आपले जहाज पाठवले आहे.

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरबंदर इथल्या किनाऱ्यावरुन २१७ समुद्र मैलावर अरबी समुद्रात इस्राइली व्यापारी जहाजाला टार्गेट करण्यात आले आहे. हे जहाज कच्चं तेल घेऊन सौदी अरेबियातील एका बंदरातून कर्नाटकच्या मंगळुरु बंदराच्या दिशेनं प्रवास करत होतं. ड्रोनने झालेल्या हल्ल्यानंतर जहाजावर आग लागली होती. ती आग विझवण्यात यश आले आहे.

हे ही वाचा:

सावरकरांवरील कार्यक्रमाला पाठवले म्हणून प्राचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मराठा समाजाला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा मुहूर्त

कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना

सध्या तरी जहाजावरील आग विझली असली तरी त्याचा परिणाम जहाजाच्या कामकाजावर झाला आहे. या जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय तटरक्षक दलाचं जहाज आयसीजीएक्स विक्रमला पाचारण करण्यात आलं. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आयसीजीएस विक्रमला भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या गस्तीवर तैनात करण्यात आलं होतं. या जहाजाला संकटात अडकलेल्या जहाजाबाबत निर्देश मिळाल्यानंतर तातडीने हे जहाज मदतीसाठी रवाना झालं. या जहाजावरील सर्व सेलर हे सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये २० भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

Exit mobile version