‘हसिना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता’

‘हसिना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता’

नवाब मलिक यांचा ईडीला जबाब

गोवावाला कम्पाउंड मनीलॉंडरिंग प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिक यांनी दिलेला जबाब धक्कादायक आहे.

ईडीला दिलेल्या जबाबात मलिक यांनी म्हटले आहे की, हसीना पारकरचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर म्हणून काम पाहणारा सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. मलिक यांनी म्हटले आहे की, २००२ सालापासून मी सलीम पटेलला ओळखत होतो. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता.

नवाब मलिक यांनी ईडीला दिलेल्या जबाब टीव्ही ९ च्या हाती आल्याचा दावा करण्यात आला असून त्यात म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी जबाबात गोवावाला कंम्पाऊंड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, अस म्हटलंय. गोवावाला कम्पाऊंडच्या संबंधित व्यवहारात नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक यांचाही महत्वाचा रोल आहे.

हे ही वाचा:

डावा भाट इरफान ‘मुघलाई’…

मुस्लिम कधी दाखवणार मनाचा मोठेपणा?

सिंहाच्या पिंजऱ्यात माणसाने टाकला हात आणि….

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर चर्चेत

 

२००५ साली मलिक यांनी सलीम पटेल विषयी लोकांना विचारलं त्यावेळी त्यांना त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलं असेही म्हटले आहे. सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची, असे त्यांनी म्हटले आहे.

गोवावाला कम्पाऊंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून १५ लाख मिळाले होते, ही बाबही समोर आली आहे. यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला ५ लाख, हसीना पारकरला रोख स्वरूपात ५ लाख आणि चेकमध्ये ५ लाख असे पैसे देण्यात आले होते. हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते.

Exit mobile version