29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामाडिआरआयने पकडले ६१.५ किलो सोने

डिआरआयने पकडले ६१.५ किलो सोने

Google News Follow

Related

महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डिआरआयने दिल्ली विमानतळावर तस्करीचे सोने जप्त केले आहे. या कारवाई अंतर्गत एकूण ६१.५ किलो वजनाचा सोन्याचा माल जप्त करण्यात आला आहे. “गोल्डन टॅप” हे सांकेतिक नाव वापरून हे गुप्तचर ऑपरेशन करण्यात आले आहे. या अंतर्गत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्‍यांनी ११ मे २०२२ रोजी ,लपवून सोन्याची तस्करी केली जात असल्याच्या संशयावरून, दिल्ली हवाई मालवाहतूक संकुलामध्ये, विमानमार्गे आयात मालाची खेप रोखली.

या मालाच्या खेपेमध्ये त्रिकोणी व्हॉल्व्ह असल्याचे घोषित करण्यात आले होते. या मालाची खेप चीनच्या ग्वांगझू येथून जपान एअरलाइन्सच्या विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली होती. गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या काटेकोर आणि प्रदीर्घ तपासणीनंतर, मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या त्रिकोणी व्हॉल्व्हमध्ये २४ कॅरेट सोने लपवून ठेवलेले आढळले. क्लिष्ट पद्धतीने लपवलेले हे सोने शोधून काढण्याची प्रक्रिया वेळ घेणारी होती आणि ती काळजीपूर्वक करणे आवश्यक होते.

हे ही वाचा:

एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

रायपूर विमानतळावरील हेलिकॉप्टर अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

मंत्रालयसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न

महसूल गुप्तचर अधिकाऱ्यांनी संकलित केलेली विशिष्ट गुप्त माहिती नसती तर ते सोने पकडले गेले नसते. कसून तपासणीनंतर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांना मालाच्या खेपेतून, ३२.५ कोटी.रुपये बाजारमूल्याचे ९९ टक्के शुद्ध ६१.५ किलोग्राम सोने जप्त करण्यात यश मिळाले.

हवाई मालवाहतुकीद्वारे आणि कुरिअरच्या माध्यमातून आलेल्या मालातून महसूल गुप्तचर संचालनालयाने अलीकडेच केलेल्या सोने जप्तीच्या कारवायांनंतर हे नवीन प्रकरण समोर आले आहे. या कारवायांमध्ये मे २०२२ मध्ये लखनौ आणि मुंबईमध्ये ५.८८ कोटींहून अधिक किंमतीचे ११ किलो सोने जप्त करण्यात आले होते आणि त्याआधी नवी दिल्ली येथे, जुलै २०२१ मध्ये कुरिअरद्वारे आलेल्या मालाच्या खेपातून ८ कोटी रुपये किमतीचे १६.७९ किलो सोने आणि त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये हवाई मार्गे आलेल्या मालाच्या खेपेतून ३९.३१ कोटी रुपये किंमतीचे ८०.१३ किलो सोने जप्त केल्याचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा