महसूल गुप्तचर संचालनालयाने आवळल्या आयफोन तस्करांच्या मुसक्या

महसूल गुप्तचर संचालनालयाने आवळल्या आयफोन तस्करांच्या मुसक्या

भारतात प्रचंड मागणी असलेल्या ऍपल कंपनीच्या आयफोन या प्रसिद्ध मोबाईलची तस्करी मुंबई येथे पकडण्यात आली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने धडक कारवाई करत हे आयफोन जप्त केले आहेत. शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

हॉंगकाँग येथून हा माल मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC) येथे आणण्यात आला होता. या मालाच्या कागदपत्रांमध्ये हा माल ‘मेमरी कार्ड’ असल्याचे जाहीर करण्यात आला होता. पण प्रत्यक्ष तपासणीत असे दिसून आले की या मालामध्ये आयफोन, आयवॉच, गुगल पिक्सेल फोन असा मुद्देमाल सापडला आहे.

हे ही वाचा:

औषध खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवून मुंबईकरांच्या आरोग्याची हेळसांड

वकील महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

चार वर्षे झाली तरी हुतात्मा ‘चौका’चे हुतात्मा ‘स्मारक’ का झाले नाही?

कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर; विरोधकांचा प्रचंड गोंधळ

या पकडलेल्या मालामध्ये एकूण ३६४६ (तीन हजार सहाशे सेहेचाळीस) आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स हे मोबाईल फोन सापडले. तर त्या सोबतच १२ गुगल पिक्सेल प्रो आणि १ ऍपल स्मार्टवॉच सापडले आहे. या सर्व वस्तू सीमा शुल्क कायदा, १९६२ अंतर्गत जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या या सर्व मालाची एकूण किंमत सुमारे रु.४२.८६ कोटी रुपये इतके आहे. तथापि मालाचे घोषित मूल्य हे फक्त ८० लाख रुपये होते.

हा मुद्देमाल पकडत महसूल गुप्तचर विभागाने आंतरराष्ट्रीय फोन तस्करीचे मोठे रॅकेट उघड केले आहे. सीमा शुल्क चुकवण्यासाठी हा माल छुप्या मार्गाने हा माल भारतात आणला जात होता.

Exit mobile version