खुन,खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी यासारख्या गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या पूर्व उपनगरातील ७९ सराईत गुन्हेगारांना तीन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या गुंडाच्या हद्दीपारीमुळे पूर्व उपनगरातील गुन्हेगारी वर नियंत्रण मिळवता येईल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्व सामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
पूर्व उपनगरातील शिवाजी नगर,मानखुर्द, देवनार,आरसीएफ,चेंबूर, टिळक नगर,गोवंडी, ट्रॉम्बे, नेहरू नगर आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या स्थानिक गुंडा कडून स्थानिका मध्ये दहशत निर्माण करून स्थानिका कडून खंडण्या गोळा करणे त्यांना मारहाण करणे, हत्येचा प्रयत्न,लूटमारीचे प्रकार सुरू होते.
हे ही वाचा:
महानगरपालिका अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्यांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप
सूत्रांच्या पूड्यांचा अर्थ एवढाच महाविकास आघाडीचे तारु बुडते आहे
हाताने मैलासफाईची पद्धत बंद करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा असेल एक दुर्मिळ सन्मान
या गुन्हेगारांच्या कृत्यामुळे स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, या गुंडामध्ये अनेक गुंडांना हद्दपार करून देखील हे गुंड हद्दपारीचा आदेश डावलून परिसरात दहशत निर्माण करीत होते. या गुंडांना हद्दपार करण्यासाठी परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांच्या आदेशावरून संबंधित पोलीस ठाण्याने मागील सहा महिन्यात पूर्व उपनगरातील ७९ सराईत गुंडांना मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार करण्यात आलेले गुंड हे सराईत असून यांच्यावर अनेक गुन्हेगार असून शिवाजी नगर, देवनार,मानखुर्द आणि आरसीएफ पोलीस ठाण्यातून सर्वात अधिक गुंडांना हद्दपार करण्यात आले आहे.