महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांना बुधवारी तेलंगणा पोलीस अधिकाऱ्याने धक्काबुक्की केल्याने ते जखमी झाले आहेत . त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. तेलंगणात भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासोबत असताना ही घटना घडली आहे.
डॉ. राऊत यांना स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जोरात धक्काबुक्की केली, त्यामुळे ते जमिनीवर पडले, त्यांच्या डोक्याला, उजव्या डोळ्याच्या वर, हाताला आणि पायाला दुखापत झाली. डोळाही काळानिळा पडला आहे. पोलिसांच्या वागण्यामागचा हेतू स्पष्ट नसला तरी डॉ. राऊत यांना हैदराबाद येथील वसावा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.
मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो आणि जवळपास चारमिनार ओलांडला होता. मी रंगमंचाकडे जात असताना राहुल गांधींचा ताफा आला, पोलिस पॅनिक झाले आणि मला धक्का दिला. मी बरीरिकेट्सच्या जवळ पडलो आणि मला दुखापत झाली. रक्तस्त्राव होऊ लागला आणि अखेर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
हे ही वाचा:
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी
मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश
भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची
राहुल गांधी यांनी दूरध्वनीद्वारे डॉ. राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एआयसीसीचे पदाधिकारी के.सी. वेणुगोपाल, के. राजू, राजेश लिलोथिया, इम्रान प्रतापगडी, कन्हैया कुमार, तेलंगणातील विरोधी पक्षनेते हत्ती विक्रमार्का यांनी देखील राऊत यांची विचारपूस केली आहे मूळचे नागपूरचे असलेले डॉ. राऊत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेसच्या एससी/एसटी सेलचे माजी अध्यक्ष आहेत.