दुचाकी चोरून तो विहिरीत टाकत होता…

विहिरीतून निघाल्या डझनभर दुचाकी; बुलढाण्यात दुचाकी चोरांचा नवा फंडा, स्पेअरपार्ट काढून दुचाकी विहिरीत फेकायचे!

दुचाकी चोरून तो विहिरीत टाकत होता…

जिल्ह्यासह परिसरात विशेषत: सरकारी कार्यालयं आणि गर्दीच्या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा या चोरीचा छडा लावण्याकरता कामाला लागली होती. यामध्ये पोलिसांना मोठं यश आलं आहे. जिल्ह्यातील शेगाव परिसरातील एका विहिरीतूनच दुचाकी निघायला सुरुवात झाली आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

बुलढाणा शहरांतील खामगाव शहरात दुचाकी चोरांच्या घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी शेगावमधून एका संशयिताला अटक केली आहे. बुलढाणामध्ये चक्क दुचाकी विहिरीत सापडल्या आहेत. दुचाकी चोरीच्या एका घटनेनंतर संशयित आरोपीची चौकशी केल्यावर पोलिसांसमोर ही बाब समोर आली. खामगाव शहरात दुचाकी चोरांच्या घटना वाढल्या असल्याने पोलिसांचा शोध सुरु होता. या संशयिताला शेगावमधून अटक करून पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. मात्र या दुचाकींचे काय केले हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

आरोपीने सांगितले की, दुचाकी चोरून तो फक्त बॅटरी आणि टायर विकायचा आणि उरलेली दुचाकी शेगाव संग्रामपूर मार्गावरील विहिरीत टाकून द्यायचा. या विहिरीतून १२ दुचाकी बाहेर काढल्या असून अजून अनेक दुचाकी त्यात असल्यामुळे नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली आहे. शेगाव परिसरातील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम (वय ३८ वर्षे) याला ताब्यात घेऊन दुचाकी चोरीबाबत चौकशी केली होती. काही जण अजून या टोळीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला

सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू

दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

बुलढाणा जिल्ह्यात सरकारी कार्यालयं आणि गर्दीच्या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा या चोरीचा छडा लावण्याकरता कामाला लागली होती. दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात बुलढाणा पोलिसांना यश आलं. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली. चोरटे स्पेअरपार्ट काढून दुचाकी विहिरीत फेकत होते. शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणं सुरु केलं आणि आतापर्यंत तब्बल १२ दुचाकी बाहेर काढण्यात आल्या आहेत.

Exit mobile version