डोंबिवलीतील पीडित तरुणीने दिला जबाब…म्हणाली, मुख्य आरोपी घेत होता पैसे!

डोंबिवलीतील पीडित तरुणीने दिला जबाब…म्हणाली, मुख्य आरोपी घेत होता पैसे!

डोंबिवलीतील सामूहिक अत्याचार मध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने जबाब दिला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पीडित तरुणीचा मित्र हा हे काम करण्यासाठी इतरांकडून पैसे घेत होता अशी धक्कादायक बाब पीडित मुलीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे. २२ मार्च रोजी पीडितेच्या मित्राने इतरांना एका मित्राच्या घरी बोलावले होते. त्या ठिकाणी एकूण १४ जण एकत्र आले होते. त्यावेळी हा मित्र काही जणांकडून पाचशे पाचशे रुपये घेत होता, अशी धक्कादायक माहिती पीडितेकडून कळली आहे.

डोंबिवलीत उघडकीस आलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी मानपाडा पोलिसांनी २८ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. गुरुवारी २६ जणांना अटक केली होती, त्यात दोघे जण अल्पवयीन असून त्यांची रवानगी बालसुधारगृह भिवंडी येथे करण्यात आली आहे. या गुन्हयात एकूण ३३ आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून २९ आरोपींची ओळख पटलेली असून इतर ४ आरोपीचे नाव पत्ता पीडित मुलीला माहीत नसल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात येत असल्याचे पोलीसानी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २९ जानेवारी रोजी नांदीवली टेकडी या ठिकाणी एका घरात चार जणांनी एकापाठोपाठ बळजबरीने सामूहिक अत्याचार केला तर एकाने मोबाईल मध्ये त्याचा व्हिडीओ तयार केला. या घटनेने घाबरलेल्या पीडितेने याची वाच्यता कुठे न करता, सर्व मुलाचे मोबाईल क्रमांक डिलीट करून त्यांना भेटण्यास टाळू लागली.

मात्र त्यातील मुख्य आरोपीने २१ फेब्रुवारी रोजी पीडितेच्या घराजवळ येऊन तिचा व्हिडीओ घरच्यांना दाखवण्याची धमकी देऊन पीडितेला देसले पाडा येथे राहणाऱ्या एका मित्राच्या घरी घेऊन आला. त्या ठिकाणी अगोदरच ७ जण उपस्थित होते. पीडितेला मित्राने बळजबरीने कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी दिले. त्यानंतर पीडितेला गुंगी आली. पीडित मुलगी ज्या वेळी शुद्धीवर आली तेव्हा तिच्यासोबत पुन्हा काही तरी वाईट झाले हे तिच्या लक्षात आले.

हे ही वाचा:

मोदी खरे हिरो, बाकी नेत्यांनी प्रेरणा घ्यावी

४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट

महाबळेश्वर: अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी शिवसेना नेत्याची मुले आरोपी

भारतीय हवाई दलात लवकरच येणार एअरबस

या घटनेनंतर इतर तीन आरोपी तिला वारंवार मोबाईलवर फोन करून भेटायला बोलावू लागले, मात्र पीडितेने त्यांना टाळले. २२ मार्च रोजी सायंकाळी पीडितेचा मित्र याने पीडितेला पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रिक्षातून डोंबिवली पूर्व येथे एका मित्राच्या घरी आणले. त्या ठिकाणी अगोदरच १४ जण हजर होते, त्यावेळी पीडितेला पुन्हा कोल्ड्रिंगमध्ये नशा येणारे द्रव्य मिसळून जबरदस्ती प्यायला दिले. त्यानंतर पीडिता चक्कर येऊन पडली. ज्या वेळी तिला शुद्ध आली त्यावेळी धक्कादायक प्रकार पीडितेने बघितला.

तिचा मित्र हा रूम वर हजर असणाऱ्याकडून प्रत्येकी ५०० रुपये घेत होता अशी धक्कादायक माहिती पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिली आहे. या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मित्राचे मित्र असे या पीडितेला नशेचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करीत होते.

Exit mobile version