डोंबिवली हादरले! अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार

डोंबिवली हादरले! अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार

डोंबिवलीतून १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्काराची गंभीर घटना समोर आली आहे. मागील ९ महिन्यांत तब्बल २९ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री या साऱ्या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

या क्रूर घटनेने संपूर्ण डोंबिवली शहर हादरले आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात आपल्या कारवाईला सुरुवात केली असून आतापर्यंत २३ आरोपीना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. तर उर्वरित ६ आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती मानपाडा पोलिसानी दिली आहे.

ही पीडित मुलगी डोंबिवली पूर्वच्या भोपर भागातील रहिवासी होती. या पीडित मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. याचा फायदा घेत या तरुणाने जानेवारी महिन्यात या तरुणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर हा व्हिडीओ आपल्या मित्राला दिला असता त्याने व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या मित्राला व्हिडीओ पाठवला असे करता करता ९ महिन्यात या व्हिडीओच्या माध्यमातून तब्बल २९ जणांनी या पीडित मुलीला धमकावून तिच्यावर बळजबरीने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात अत्याचार केला.

हे ही वाचा:

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार?

किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये

बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

हा प्रकार सुरू असतानाहा अखेर पीडित तरुणीने तिच्या सोबत होणाऱ्या या प्रकाराला कुटूंबासमोर वाचा फोडली. हे सारे समजताच घरच्यांना धक्का बसला. बुधवारी रात्री पीडितेचे कुटुंब मुलीला घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात आले आणि या संबंधी तक्रार दाखल केली. मानपाडा पोलिसानी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करून तिच्या जबाबवरून २९ जणांविरुद्ध सामूहिक अत्याचार, धमकी देणे, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. रात्रीच पोलिसांनी आरोपींची धरपकड करीत २३ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे जण अल्पवयीन असून त्यांना भिवंडी येथील बाल सुधार गृह येथे पाठवण्यात आले आहे.

Exit mobile version